मेट्रो ३ च्या एकत्रित चाचण्यांना सुरुवात, आरे ते बीकेसी मार्गिकेच्या रविवार-सोमवारच्या वेळापत्रकात बदल

चाचण्यांमुळं रविवारी आणि सोमवारी सकाळी आणि रात्रीच्या सेवांच्या वेळेत कपात करण्यात आली आहे.

मुंबई : मुंबईतील रेल्वे लोकलनंतर मुंबईकर प्रवासासाठी मेट्रोला मोठी पसंती देताना दिसताहेत. मेट्रोमुळं रेल्वेवरील मोठा प्रवाशांचा ताण कमी झाला आहे. दरम्यान, याच मेट्रो ३ च्या एकत्रित चाचण्यांबाबत एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे. शनिवारपासून एमएमआरसी’कडून आरे ते बीकेसी आणि बीकेसी-आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानकांदरम्यानच्या एकत्रितपणे चाचण्यांना सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळं जर तुम्ही मेट्रोने प्रवास करणार असाल तर वेळापत्रक पाहूनच प्रवास करा.

वेळापत्रका बदल…

दरम्यान, मेट्रोच्या एकत्रित चाचण्यांमुळं वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. रविवारी आणि सोमवारी सकाळी आणि रात्रीच्या सेवांच्या वेळेत कपात करण्यात आली आहे. दरम्यान, रविवारी वेळापत्रकानुसार सकाळी ८.३० वाजता (१३ एप्रिल) पहिली गाडी सुटणार आहे. मात्र शेवटची गाडी रात्री १०.३० ऐवजी रात्री ९.३० वाजता सुटणार आहे. त्यामुळे रविवारी सेवा कालावधीत एक तासाची कपात होणार आहे. तर सोमवारी (१४ एप्रिल) सकाळी ६.३० ऐवजी सकाळी ७.३० वाजता पहिली मेट्रो गाडी सुटणार आहे. तर शेवटची गाडी रात्री १०.३० ऐवजी रात्री ९ वाजता सुटणार आहे. सोमवारी सकाळी १ तासाचा सेवा कालावधी, तर रात्री दीड तासाचा सेवा कालावधी कमी करण्यात आला आहे. प्रवाशांनी वेळापत्रक याची माहिती घेऊनच मेट्रो ३ मार्गिकेवरून प्रवास करावा, असं आवाहन मेट्रोने केले आहे.

मेट्रोचा बीकेसी ते वरळी टप्पा लवकरच सुरु…

दुसरीकडे आरे ते बीकेसी टप्पा ऑक्टोबर २०२४ मध्ये एमएमआरसीच्या ३३.५ किमी लांबीच्या भुयारी मेट्रो मार्गिका वाहतूक सेवा सुरु झाली होती. आता लवकरच आगामी काळात काही दिवसांत बीकेसी ते आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानक, वरळी दरम्यानचा टप्पा प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. या टप्प्याच्या संचलनासाठीची तसेच सुरक्षा प्रमाणपत्र प्राप्त करून घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. टप्पा १ आणि टप्पा २ अ च्या एकत्रित चाचण्यांसाठी हा बदल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. एकत्रित चाचण्या सुरू झाल्याने टप्पा २ अ दृष्टीक्षेपात आला आहे. लवकरच मुंबईकरांना आरे ते आचार्य अत्रे चौक, वरळी दरम्यान थेट मेट्रो प्रवास करता येणार आहे. त्यामुळं मुंबईकरांचा प्रवास आणखी जलदगतीने होणार आहे.


About Author

Astha Sutar

Other Latest News