मुंबईत सकाळपासून ढगाळ वातावरण आणि रिमझिम पाऊस, यलो अलर्ट जारी…

विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनासह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. तसेच उच्च भरतीची वेळ दुपारी १२ वाजून १३ मिनिटांनी असेल आणि लाटा ४.८८ मीटर उंचीच्या असतील, असं हवामान विभागाने म्हटलं आहे.

mumbai – सोमवारी मुंबई आणि उपनगरात दमदार पावसाने मुंबईतील ठीक-ठिकाणी पाणी साचले. या पावसामुळे मुंबईची तुंबई झाली. रविवारी रात्रीपासून मुसळधार पावसाने राज्यातील विविध भागात जोरदार हजेरी लावली. मुंबईत मुसळधार पडलेल्या पावसाचा फटका रेल्वे वाहतूक आणि रस्ते वाहतुकीवर सुद्धा दिसून आला. दरम्यान, २ दिवसाच्या पावसानंतर आज मुंबईत सकाळपासून ढगाळ वातावरण आणि रिमझिम पाऊस सुरू आहे. तर लोकल सेवा सुरळीत सुरु आहे.

मुंबईत रिमझिम पाऊस…

दुसरीकडे सोमवारी मुंबईतील भूमिगत अॅक्वा मेट्रो लाईनमध्ये पाणी शिरले होते. त्यामुळं वरळीतील आचार्य अत्रे चौक मेट्रो स्टेशन बंद करण्यात आले होते. परंतु आज पुन्हा एकदा मुंबई भूमिगत अॅक्वा मेट्रो लाईन पुन्हा सुरु करण्यात आली असून, मेट्रो सुरळीत सुरु आहे. सोमवारी मुंबईसह उपनगरात पावसाने जोरदार बॅटिंग केल्यानंतर दुसरीकडे आज मंगळवारी सकाळपासूनच मुंबईत ढगाळ वातावरण असून, रिमझिम पाऊस सुरू आहे. तर रेल्वे आणि रस्ते वाहतूक देखील व्यवस्थित सुरू आहे.

मुंबई यलो अलर्ट…

दरम्यान, कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर मुंबईत आज यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर कोकणात रेड अलर्ट देण्यात आला आहे. आज मुंबई शहर आणि उपनगरात साधारणपणे ढगाळ आकाश राहिल तसेच मेघगर्जनेसह आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार वारे वाहण्याची शक्यता असून, मध्यम ते मुसळधार पाऊसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.


About Author

Astha Sutar

Other Latest News