मुंबई – मुंबईची रेल्वे लोकल ही मुंबईकरांची जीवनवाहिनी समजली जाते. कारण याच मुंबईच्या रेल्वे लोकलमधून दररोज लाखो चाकरमानी प्रवास करत आपला संसाराचा गाडा चालवतात. रेल्वे लोकल हे मुंबईकरांचे मुख्य साधन आहे. आता याच रेल्वेबाबत मध्य रेल्वेच्या प्रवासासाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. सध्या उन्हाळा सुरू आहे आणि कमालीचा उकाडा आहे. त्यामुळे मध्य रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा देण्यासाठी मध्य रेल्वेने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेवरती 14 एसी लोकल फेऱ्या वाढवणार असल्याचे मध्य रेल्वे म्हटले आहे. त्यामुळे प्रवासी आणखी गारेगार होणार आहेत.
16 एप्रिलनंतर निर्णय…
दरम्यान, सध्या वातावरणातील तापमानाचा पारा कमालीचा वाढला आहे. अंगाची लाहीलाही होत आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांना दिलासा देण्यासाठी रेल्वेनं महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 14 वातानुकूलित लोकर फेऱ्या सुरू करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. या नव्या फेऱ्या जुन्या फेऱ्यांच्या जागी धावणार आहेत. त्यामुळे साध्या लोकलच्या फेऱ्या कमी करून त्याची जागी एसी लोकलच्या फेऱ्या वाढवण्यात येणार आहेत. त्यामुळे सामान्य प्रवाशांना याचा त्रास होण्याची शक्यता आहे. सध्या 66 एसी लोकल फेऱ्या असून 16 एप्रिलनंतर याची संख्या 80 करण्यात येणार आहे, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.

या साध्या लोकलची जागा एसी लोकलमध्ये…
- सकाळी ७.३४ कल्याण-सीएसएमटी
- सकाळी १०.४२ बदलापूर-सीएसएमटी
- दुपारी १.२८ ठाणे-सीएसएमटी
- दुपारी ३.३६ ठाणे-सीएसएमटी
- सायंकाळी ५.४१ ठाणे-सीएसएमटी
- रात्री ९.४९ ठाणे-सीएसएमटी
- रात्री ११.०४ बदलापूर-ठाणे अशा अप मार्गावरील लोकल फेऱ्या आता एसी लोकल म्हणून धावणार आहेत.
- डाउन मार्गावरील पहाटे ६.२६ विद्याविहार ते कल्याण
- सकाळी ९.०९ सीएसएमटी ते बदलापूर
- दुपारी १२.२४ सीएसएमटी ते ठाणे
- दुपारी २.२९ सीएसएमटी-ठाणे
- दुपारी ४.३८ सीएसएमटी ते ठाणे
- सायंकाळी ६.४५ सीएसएमटी ते ठाणे
- रात्री ९.०८ सीएसएमटी ते बदलापूर या लोकलचे एसी लोकलमध्ये रुपांतर करण्यात आले आहे.