अनन्याच्या भावाचं बॉलिवूडमध्ये पदार्पण, शुक्रवारी पाहता येणार पहिली झलक

यशराज फिल्म्स पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर आणखी एक नवा चेहरा आणत आहे. मोहित सुरी, ज्याने आधीच आशिकी २ ची निर्मिती केली, तो आणखी एक रोमँटिक चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे

आज अनन्या पांडे आपले वडील चंकी पांडेप्रमाणे चित्रपट जगतात नाव कमावत आहे. बॉलिवूडमध्ये तिने बऱ्या अंशी यशही संपादन केलं आहे. अनन्या पांडेनंतर आता तिचा भाऊ अहान पांडे चित्रपट क्षेत्रात पदार्पण करीत आहे.

चंकी पांडेचा भाचा अहान पांडेच्या डेब्यूबाबत बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरू होती. अखेर अहानच्या डेब्यू चित्रपटाचा टीझर रिलिज होणार आहे. भारतीय प्रेक्षकांना काही अविस्मरणीय प्रेमकथा देणाऱ्या यशराज फिल्म्स (YRF) चा आगामी चित्रपट ‘सैयारा’ या शुक्रवारी टीझरच्या रूपात आपली पहिली झलक दाखवणार आहे. हा चित्रपट प्रसिद्ध दिग्दर्शक मोहित सूरी यांनी दिग्दर्शित केला असून, प्रेमकथेचा गहिरा अनुभव देणार आहे.

अहानचं बॉलिवूडमध्ये पदार्पण…

सैयारा या चित्रपटामधून अहान पांडे बॉलिवूडमध्ये पदार्पण करत असून, त्यांच्या समवेत अनीत पड्डा मुख्य भूमिकेत आहे. अनीत ने वेब सिरीज बिग गर्ल्स डोंट क्राई मधून प्रेक्षकांची मनं जिंकली होती. या चित्रपटाची निर्मिती यशराज फिल्म्स चे सीईओ अक्षय विधानी यांनी केली आहे. अहान आणि अनीतची फ्रेश जोडी मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. अनन्या पांडे प्रमाणे तिचा भाऊदेखील चाहत्यांची मनं जिंकू शकेल का हे तर चित्रपट प्रदर्शित झाल्यावर लक्षात येईल.

कधी होणार प्रदर्शित…

चित्रपट 18 जुलै 2025 रोजी जगभरातील थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या प्रचार मोहिमेची सुरुवात 30 मे, शुक्रवार रोजी टीझर रिलीजने होणार आहे.


About Author

Smita Gangurde

Other Latest News