देशावर सायबर वॉरचा धोका! स्पेशल ऑप्स सीझन 2 चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

ओटीटीवरील सर्वोत्कृष्ट वेब सिरीजपैकी एक मानली जाणारी स्पेशल ऑप्स पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 2020 मध्ये याचा पहिला सीझन प्रदर्शित झाला होता आणि तब्बल 5 वर्षांनंतर आता दुसऱ्या सीझनची प्रतिक्षा संपणार आहे. स्पेशल ऑप्स सीझन 2 चा अधिकृत ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला असून, त्यात देशावर मंडरावणाऱ्या सायबर वॉरच्या मोठ्या धोक्याची झलक पाहायला मिळते.

ट्रेलरमध्ये ‘सायबर वॉर’ आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा थरार

दुसऱ्या सीझनचा ट्रेलर प्रेक्षकांमध्ये चांगलाच चर्चेत आला आहे. यामध्ये फक्त अतिरेकी कारवाया नव्हे, तर सायबर हल्ला आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून देशात घातपात घडवण्याचा कट दाखवण्यात आला आहे. ट्रेलरमध्ये दाखवण्यात आले आहे की या वेळी प्रत्येकजण टार्गेटवर आहे आणि भारताची सुरक्षा यंत्रणा एका नव्या संकटासमोर उभी आहे.

प्रीमियर केव्हा आणि कुठे?

ओटीटीवरील चाहते जेव्हापासून पहिल्या सीझनचा थरार अनुभवला तेव्हापासून दुसऱ्या सीझनची उत्सुकता वाढली होती. आता ही उत्सुकता लवकरच संपणार आहे. स्पेशल ऑप्स सीझन 2 चा प्रीमियर 11 जुलै 2025 रोजी होणार असल्याचे निर्मात्यांनी स्पष्ट केले आहे. ही सिरीज जिओ हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

 सर्व एपिसोड एकाच वेळी रिलीज होणार

जर तुम्ही पंकज त्रिपाठी यांची क्रिमिनल जस्टिस सीझन 4 पाहत असाल, तर दर आठवड्याला येणारे एपिसोड किती त्रासदायक वाटतात हे सहज समजू शकतं. पण स्पेशल ऑप्स सीझन 2 च्या चाहत्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. या सीझनचे सर्व एपिसोड एकाच वेळी ओटीटीवर रिलीज होणार आहेत. म्हणजेच तुम्ही सर्व भाग सलग पाहून शोचा भरभरून आनंद घेऊ शकता.

या नव्या सीझनमध्ये ताहिर राज भसीन खलनायकाच्या भूमिकेत झळकणार आहे. ट्रेलरमध्ये त्याची झलक पाहायला मिळाली आणि तो स्टायलिश, पण तितकाच धोकादायक वाटतो. त्याची डायलॉग डिलिव्हरी संपूर्ण शोला अधिक प्रभावी बनवू शकते. याशिवाय, इतर कलाकारांनीही ट्रेलरमध्ये चांगली छाप पाडली असून, प्रेक्षकांची उत्सुकता आणखीनच वाढली आहे.

 

 


About Author

Jitendra bhatavdekar

Other Latest News