TOP OTT Series Of The Week : ओटीटीच्या युगात लोकांना घरबसल्या फुल एंटरटेनमेंटचा मसाला मिळत आहे. वेगवेगळ्या ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर प्रत्येक प्रकारचा शो पाहायला मिळत आहे. नुकत्याच काही नवीन सीरिज रिलीज झाल्या आहेत, ज्यांना मागील आठवड्यात प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. Ormax मीडिया ने मागील आठवड्यात सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या टॉप ५ सीरिजची यादी जाहीर केली आहे.
क्रिमिनल जस्टिस ४
पंकज त्रिपाठी यांची ‘क्रिमिनल जस्टिस ४’ सीरिजची प्रेक्षक फार दिवसांपासून वाट पाहत होते. ही सीरिज २९ मे २०२५ रोजी जिओ हॉटस्टारवर रिलीज झाली असून ती लोकांना खूप आवडत आहे. या सीरिजला ८.४ मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. या सीरिजमध्ये मोहम्मद झिशान अय्यूब, सुरवीन चावला, आशा नेगी, बरखा सिंग, श्वेता बसु प्रसाद आणि खुशबू अत्रे हे स्टार कलाकार आहेत.

हार्ट बीट सीझन २
या यादीत दुसऱ्या क्रमांकावर ‘हार्ट बीट सीझन २’ आहे. ही सीरिज २२ मे रोजी जिओ हॉटस्टारवर आली होती आणि लोकांना आवडत आहे. मात्र व्ह्यूजच्या बाबतीत ती मागे राहिली आहे. दीपा बालू आणि अनुमोल यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या सीरिजला मागील आठवड्यात २.२ मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत.
द लास्ट ऑफ अस सीझन २
तिसऱ्या क्रमांकावर हॉलीवूड सीरिज ‘द लास्ट ऑफ अस सीझन २’ आहे. ही सीरिज १३ एप्रिल २०२५ पासून सुरू झाली असून, २०२३ मध्ये आलेल्या ‘द लास्ट ऑफ अस’ सीरिजचा दुसरा भाग आहे. हीदेखील जिओ हॉटस्टारवर उपलब्ध असून तिला २.१ मिलियन वेळा पाहिलं गेलं आहे.
है जूनून
जॅकलिन फर्नांडिस आणि नील नितीन मुकेश यांची ‘है जूनून’ सीरिज चांगलीच चर्चेत आहे. १६ मेपासून जिओ हॉटस्टारवर स्ट्रीम होणारी ही वेब सीरिज प्रेक्षकांना खूप आवडत आहे. याला मागील आठवड्यात २ मिलियन व्ह्यूज मिळाले. या सीरिजमध्ये बोमन इराणी आणि सिद्धार्थ निगमही महत्त्वाच्या भूमिकांमध्ये आहेत.
कनखजूरा
सोनी लिव्हवर स्ट्रीम होणारी ‘कनखजूरा’ ही सीरिज देखील प्रेक्षकांच्या मस्ट वॉच लिस्टमध्ये सामील झाली आहे. मोहित रैना आणि रोशन मैथ्यू यांच्या प्रमुख भूमिका असलेली ही सीरिज ३० मे रोजी ओटीटीवर आली होती. केवळ तीन दिवसांतच तिला १.८ मिलियन लोकांनी पाहिले आहे.