दर आठवड्याला ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर नवीन वेब सिरीज आणि शो प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. गेल्या आठवड्यात कोणत्या शोने सर्वाधिक लोकप्रियता मिळवली, याची यादी ऑरमैक्स मीडियाने जाहीर केली आहे. चला तर मग सध्या पाहूया टॉप 5 वेब सिरीज कोणत्या आहेत.
क्रिमिनल जस्टिस 4 (Criminal Justice 4)
पंकज त्रिपाठी यांची ही कोर्टरूम ड्रामा सिरीज अजूनही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. 5.3 मिलियन व्ह्यूज मिळवत या सीरीजने यादीत पहिले स्थान पटकावले आहे. ही सिरीज जिओ हॉटस्टारवर पाहता येईल.

राणा नायडू 2 (Rana Naidu 2)
राणा दग्गुबाती आणि वेंकटेश यांच्या मुख्य भूमिका असलेली ही एक्शन थ्रिलर सिरीज 13 जून रोजी नेटफ्लिक्सवर रिलीज झाली. अल्पावधीतच तिने 3.2 मिलियन व्ह्यूज मिळवून दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे.
द ट्रेटर्स (The Traitors)
करण जोहर याचा रिअॅलिटी शो ‘द ट्रेटर्स’ प्रेक्षकांना चांगलाच आवडला आहे. सेलेब्समधील संघर्ष आणि गेम स्ट्रॅटेजी पाहायला मिळते. या शोला 2.7 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत आणि तो प्राईम व्हिडीओवर पाहता येईल.
लफंगे (Lafange: Sapne, Dosti, Duniya)
बरखा सिंग, हर्ष बेनीवाल आणि गगन अरोरा यांच्या अभिनयाने सजलेली ही फ्रेंडशिप-ड्रामा सिरीज 2.2 मिलियन व्ह्यूजसह चौथ्या स्थानावर आहे. ती Amazon MX Player वर मोफत उपलब्ध आहे.
गेमर लोग (Gamer Log)
17 वर्षाच्या मुलाच्या गेमिंग जर्नीवर आधारित ही हलकीफुलकी सिरीज देखील प्रेक्षकांना भावली आहे. तिला 1.6 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. ही सिरीज Amazon MX Player वर मोफत पाहता येईल.