मुंबई – 26 नोव्हेंबर 2008 या मुंबईतील दहशतवादी हल्ल्यातील मुख्य सूत्रधार मास्टर माईंड तहव्वूर राणाला आज भारतात आणले जाणार आहे. अमेरिकेने राणाला भारताकडे प्रत्यार्पण करण्याचा निर्णय घेतल्यानंतर सर्व कायदेशीर बाबी पूर्ण झाल्यानंतर आज राणाला दिल्लीत आणले जाणार आहे.
राणाला कुठल्या तुंरुगात ठेवणार?
दरम्यान, राणाला भारतात आणल्यानंतर मुंबई आणि दिल्ली या ठिकाणच्या दोन तुरुंगात त्याला ठेवण्यात येण्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याचं बोललं जातं आहे. सुरुवातीला राणाला काही दिवस राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या ताब्यात देण्यात येणार आहे. त्याच्याकडून माहिती घेतली जाणार आहे. या संपूर्ण प्रक्रियेवर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि गृहमंत्र्यांचे अधिकारी लक्ष ठेवून असणार आहेत. हल्याच्या दोन वर्षांपूर्वी राणा आणि त्याचे सहकारी डेव्हिड कोलमन हेडली उर्फ दाऊत गिलानी यांनी मुंबई हल्ल्याची योजना आखली होती. आणि भारतात येऊन त्यांनी रेकी केली होती. तसेच राणाने हेडलीसाठी पासपोर्ट मिळवला होता. जेणेकरून या दोघांचा प्रवास सोपा होईल.

राणाला फाशी देण्याची मागणी…
दुसरीकडे 26 नोव्हेंबर 2008 रोजी दहशतवादी हल्ल्यात निष्पाप अडीचशे लोकांच्यावरती बळी गेले होते. तर अनेक लोकं जखमी झाले होते. या हल्ल्याची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली होती. हा हल्ला पाकिस्तान पुरस्कृत असल्याचेही उघड झाले होते. याबाबत वारंवार पुरावे भारताने सिद्ध केले होते. या हल्ल्यातील अजमल कसाब याला जिंवत पकडण्यात आले होते. त्याला फासावर लटकवण्यात आले. तर या हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणाला भारतात आणल्यानंतर फाशीची शिक्षा देण्यात यावी. अशी मागणी जनसामान्यांचे आहे. कारण ज्याने मुंबईवर हल्ला करून अनेक निष्पाप लोकांच्या जीव घेतला, अशा राक्षसाला फाशीचाच शिक्षा योग्य होईल अशी लोकांची भावना आहे.