तहव्वूर राणाला 18 दिवसांची एनआयए कोठडी, दहशतवादी तहव्वूर राणाचा पहिला फोटो समोर, राणाची बाजू कोण मांडणार?

कॅलिफोर्नियाच्या सेंट्रल डिस्ट्रिक्ट कोर्टाने १६ मे २०२३ रोजी राणाच्या प्रत्यार्पणाचे आदेश दिले होते

मुंबई – 26 नोव्हेंबर 2008 या मुंबईतील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड, मुख्य सूत्रधार तहव्वूर राणाला गुरुवारी भारतात आणण्यात आले आहे. राणाला राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) यांनी ताब्यात घेतले असून, दरम्यान, तहव्वूर राणाला 18 दिवसांची एनआयए कोठडी सुनावण्यात आली आहे. तहव्वूर राणाच्या वतीने वकील पियुष सचदेवा हे त्याची बाजू मांडणार आहेत.

राणाचा पहिला फोटो समोर…

दरम्यान, काही वर्षापूर्वी राणाला अमेरिकेने भारतात प्रत्यार्पण करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर कायदेशीर बाबी आणि प्रक्रिया यासाठी वेळ लागल्यानंतर अखेर त्याला भारताच्या हाती सुपूर्द करण्यात आले. यानंतर राणाला गुरुवारी भारतातील दिल्ली येथे आणण्यात आले आहे. राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) राणाचा ताबा घेतल्यानंतर त्याला घेऊन जात असताना राणाचा फोटो समोर आला आहे. तीन अधिकाऱ्यांनी राणाला अटक केले आणि घेऊन जात असताना राणा फोटोमध्ये दिसतोय. दरम्यान गुरुवारी सुरक्षेच्या कारणास्तव माध्यमांना आणि सामान्य लोकांना पटियाला हाऊस न्यायालयाच्या आवारातून बाहेर काढण्यात आले होते. तर आता तहव्वूर राणाला 18 दिवसांची एनआयए कोठडी सुनावण्यात आली आहे.

राणाची बाजू कोण मांडणार…

दुसरीकडे तहव्वूर राणा हा पाकिस्तानी-कॅनडा नागरिक आहे. जो कित्येक वर्ष अमेरिकेत राहत होता. अमेरिकेच्या पोलिसांनी राणाला दहशतवादी संघटनांमध्ये सहभाग असल्यामुळे दोषी ठरवले होते. तर 26/11 मुंबईतील दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार राणा आहे. राणाने आपल्या दोन सहकाऱ्यांना मुंबईत पाठवले होते. तसेच त्यांचा पासपोर्ट आणि व्हीसा मिळवून देण्यास मदत केली होती. डेव्हिड हेडली याने मुंबईत येऊन रेकी केली होती. हा हल्ल्याचे नियोजन दोन वर्षांपूर्वी केले होते. यानंतर आता राणाला भारतात आणल्यानंतर त्याच्या विरोधात जो खटला चालणार आहे. त्याबाबत राणाची बाजू वकील पियुष सचदेवा मांडणार आहेत.


About Author

Astha Sutar

Other Latest News