आंब्याची पानं अतिशय शुभ आणि पवित्र मानली जातात. हिंदू धर्मात शुभकार्याप्रसंगी आंब्याच्या पानाला खूप महत्त्व दिलं गेलं आहे. कोणत्याही धार्मिक कार्यात आंब्याच्या पानांचा वापर केला जातो. आंब्याची पाने पूजेदरम्यान वापरली जातात. कोणतंही शुभकार्य आंब्याच्या पानांची डहाळी लावल्याशिवाय पूर्ण होत नाही. ज्या घरात आंब्याचे झाड असते, त्या घरावर नेहमी देवी-देवतांच्या आशीर्वादांचा वर्षाव होतो. यामुळेच घर, दुकान किंवा इतर कोणत्याही ठिकाणी केलेल्या कामात आंब्याची पाने नेहमी वापरली जातात.
आंब्याच्या पानांचा उपयोग पूजेत का केला जातो.
आंब्याचे झाड शुभ आणि पवित्र मानले जाते आणि त्याची पाने सकारात्मक ऊर्जा आणि देव-देवतांच्या आशीर्वादांची प्रतीक आहेत. त्यामुळेच पूजा, विवाह आणि इतर शुभ कार्यांमध्ये आंब्याच्या पानांचा वापर केला जातो.

पूजा
पूजा आणि धार्मिक विधींमध्ये आंब्याची पाने वापरली जातात, जी देवतेची कृपा प्राप्त होण्यास मदत करतात.
लग्न
लग्नात आंब्याची पाने वापरली जातात, जी नवदाम्पत्याच्या समृद्धी आणि सुखी आयुष्याचं प्रतीक मानतात.
गृहप्रवेश
गृहप्रवेश आणि इतर शुभ कार्यांमध्ये आंब्याची पाने वापरली जातात, जी घरात सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धी आणतात.
हवन-यज्ञ
(टीप : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)