वरुथिनी एकादशी कधी आहे? तारीख, मुहूर्त आणि महत्त्व जाणून घ्या

वरुथिनी एकादशी म्हणजे नक्की काय? जाणून घ्या या दिवसाचे महत्त्व

हिंदू मान्यतेनुसार, एकादशी खूप महत्त्वाची आहे आणि या व्रताचे अनेक फायदे आहेत. हे व्रत भगवान विष्णूशी संबंधित आहे. वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला वरुथिनी एकादशी म्हणतात. या दिवशी उपवास करणे खूप शुभ मानले जाते आणि हे उपवास केल्याने मोक्ष मिळतो आणि सर्व पापे धुऊन जातात. जो कोणी या दिवशी व्रत करतो तो सर्व पापांपासून मुक्त होतो, आनंदी राहतो आणि त्याला शुभ फळे मिळतात. वरूथिनी एकादशीला दान केल्याने अनेक वर्षांच्या तपश्चर्येचे फळ मिळते. या वर्षी एप्रिलमध्ये वरूथिनी एकादशीचे व्रत कधी पाळले जाईल ते जाणून घ्या.

वरुथिनी एकादशीचे महत्त्व
वरुथिनी एकादशीचे व्रत पाळल्याने पापांचे क्षय होते आणि सौभाग्य प्राप्त होते असे मानले जाते, असे सांगितले जाते. या व्रताने नकारात्मक प्रभावांपासून संरक्षण मिळते आणि मोक्ष मिळतो, असेही म्हटले जाते. भगवान श्रीकृष्णांनी युधिष्ठिराला वरुथिनी एकादशी व्रताचे महत्त्व सांगितले होते, त्यानुसार जो कोणी वरुथिनी एकादशीचे व्रत पाळतो त्याची सर्व पापे नष्ट होतात आणि शेवटी त्याला स्वर्ग प्राप्त होतो अशी मान्याता आहे.

वरुथिनी एकादशी 2025 मुहूर्त

या महिन्यात वैशाख महिन्यातील वरुथिनी एकादशी 24 एप्रिल रोजी आहे. एकादशीची तिथी २३ एप्रिल २०२५ रोजी दुपारी ४:४३ वाजता सुरू होईल आणि २४ एप्रिल २०२५ रोजी दुपारी २:३२ वाजता संपेल. त्यामुळे 24 एप्रिल रोजी व्रत पाळले जाईल. एकादशीचे व्रत केल्याने मनुष्याला अनेक पापांपासून मुक्ती मिळते आणि पुण्य प्राप्त होते असे म्हटले जाते.

वरुथिनी एकादशीचे व्रत कसे पाळावे?

एकादशीच्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून, स्नान करावे, आणि मंदिर परिसर स्वच्छ करावा. त्यानंतर, भगवान विष्णू आणि श्रीकृष्णाची पूजा करावी आणि ‘ऊँ नमो भगवते वासुदेवाय’ मंत्राचा जप करावा. उपवासादरम्यान, फळे, दूध आणि शाकाहारी पदार्थ सेवन करू शकता. दिवसभर पवित्र शास्त्रांचे वाचन करावे, विष्णु सहस्त्रनाम आणि भगवद्गीतेचा जप करावा. द्वादशीच्या दिवशी सूर्योदयानंतर उपवास सोडावा. शक्य असल्यास या दिवशी ब्राह्मणांना अन्नदान करा. जो कोणी विधीवत पद्धतीने आणि खऱ्या भक्तीभावाने एकादशीचे व्रत करतो त्याला सर्व संकटांपासून मुक्ती मिळते.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News