चुकूनही ‘या’ दिवशी केस धुवू नका, त्यामुळे होऊ शकते नुकसान….

हिंदू धर्मात तरुणी आणि विवाहित महिलांसाठी काही नियम सांगितले आहेत. त्यामधील एक नियम म्हणजे विवाहित महिलांनी कधी केस धुवावेत याबद्दल. चुकीच्या दिवशी केस धुतल्यास तुम्हाला संकटाचा सामना करावा लागू शकतो.

हिंदू धार्मिक मान्यतेनुसार, काही दिवस अशा असतात जेव्हा महिलांनी केस धुवू नये, कारण असे मानले जाते की यामुळे घरात वाईट गोष्टी येऊ शकतात. आज आम्ही तुम्हाला केस धुण्याचे काही नियम सांगणार आहोत जाणून घेऊया….

सोमवार

वास्तुशास्त्रानुसार, महिलांनी सोमवारी केस धुवू नयेत कारण त्यामुळे पती-पत्नीमधील नात्यात संघर्ष निर्माण होतो. सोमवारी केस धुणे अशुभ मानले जाते, विशेषतः विवाहित महिलांसाठी. काही धार्मिक मान्यतेनुसार, सोमवारचे दिवस भगवान शिव आणि माता पार्वतीला समर्पित आहे, त्यामुळे या दिवशी केस धुणे योग्य मानले जात नाही. कुंवारी मुली सोमवारच्या दिवशी केस धुवू शकतात, परंतु विवाहित महिलांसाठी हे अशुभ मानले जाते. 

मंगळवार

विवाहित महिलेने मंगळवारीही केसं धुणं योग्य मानलं जातं नाही. मंगळवारी केस धुतल्यामुळे घरात नकारात्मकता वाढते.  विवाहित स्त्रियांनी मंगळवारी केस धुऊ नयेत, कारण यामुळे त्यांच्या वैवाहिक जीवनात समस्या येऊ शकतात.

बुधवार

वास्तुशास्त्रानुसार, ज्या मुलींना लहान भाऊ आहेत त्यांनी बुधवारी केस धुवू नयेत. या दिवशी विवाहित महिला केस धुवू शकतात. मात्र अविवाहित मुलींनी बुधवारी केस धुवू नये. खास करुन ज्या महिलांना लहान भावंडं असेल त्यांनी केस धुणं टाळा. बुधवारी अविवाहित मुलींना केस धुणे अशुभ मानले जाते, कारण असं मानलं जातं की यामुळे त्यांच्या आयुष्यात समस्या येऊ शकतात.

गुरुवार

हिंदू धर्मात गुरुवारी केस धुणे अशुभ मानले जाते. यामागे अनेक धार्मिक कारणे आहेत. गुरुवारी केस धुल्यास आर्थिक अडचणी येऊ शकतात, असे म्हटले जाते. वास्तुशास्त्रानुसार, गुरुवारी कोणीही केस धुवू नयेत कारण त्यामुळे दारिद्र्य येते. गुरुवारी केस धुल्यास आर्थिक अडचणी येऊ शकतात, घरात नकारात्मकता येऊ शकते. 

शुक्रवार

शुक्रवारी केस धुणे खूप शुभ मानले जाते. शुक्रवार हा दिवस देवी लक्ष्मीला समर्पित आहे आणि या दिवशी केस धुणे शुभ मानले जाते, असे सांगितले जाते. शुक्रवारी केस धुण्याने घरात वैभव आणि समृद्धी येते. शुक्रवारच्या दिवशी केस धुण्याने देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते.  

शनिवार

विवाहित महिलांनी शनिवारी केस धुवू नयेत. यामुळे शनिदेव क्रोधित होतात.

रविवार

रविवार केस धुण्यासाठी एक चांगला दिवस मानला जातो.हा दिवस केस धुण्यासाठी योग्य मानला जातो, रविवारी केस धुणे काही लोकांसाठी शुभ मानले जाते, तर काही लोकांसाठी नाही.  खास करून विवाहित महिलांसाठी नाही, तर अविवाहित महिला आणि पुरुष या दिवशी केस धुवू शकतात.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News