आज 24 एप्रिल 2025 रोजी वरुथिनी एकादशी व्रत पाळले जात आहे. ही एकादशी तिथी भगवान विष्णूंना समर्पित आहे आणि असे मानले जाते की या दिवशी उपवास केल्याने व्यक्तीच्या जीवनात आनंद, शांती आणि समृद्धी येते. वैशाख महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या एकादशीला वरुथिनी एकादशी येते. भगवान विष्णूची पूजा करण्यासाठी आणि व्रत करण्यासाठी विशेष शुभ मानली जाते. या दिवशी व्रत आणि पूजा केल्याने पापांचा नाश होतो, सौभाग्य वाढते आणि भगवान विष्णूची कृपा प्राप्त होते. या तिथीला खास मानण्याचे कारण म्हणजे या दिवशी दान-पुण्य केल्याने मोठं पुण्य मिळतं.
वरुथिनी एकादशी मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त पहाटे ४:१९ ते ५:०३ पर्यंत असेल, हा काळ ध्यान, मंत्र जप आणि पूजेसाठी सर्वोत्तम मानला जातो. विजय मुहूर्त दुपारी २:३० ते ३:२३ पर्यंत असेल, हा काळ यश घेऊन येतो. जर तुम्ही आज या शुभ मुहूर्तावर नवीन सुरुवात करण्याचा संकल्प केला तर त्याचे चांगले परिणाम मिळतील.

एकादशी व्रताचे महत्त्व
एकादशी हा हिंदू धर्मातील एक पवित्र दिवस आहे, जो भगवान विष्णूला समर्पित आहे. या दिवशी उपवास करून भगवान विष्णूची पूजा केली जाते, अशी माहिती आहे. एकादशीचे व्रत केल्याने पाप नष्ट होतात, असे मानले जाते. या व्रतामुळे व्यक्तीला जन्म-मृत्यूच्या चक्रातून मुक्ती मिळते, अशी मान्यता आहे. वरूथिनी एकादशीचे व्रत केल्याने मानधाता, धूंधुमार आणि इतर अनेक राजांना स्वर्गप्राप्ती झाली, अशी कथा आहे. या व्रतामुळे 10,000 वर्षांच्या तपश्चर्याचे फळ मिळते, असा उल्लेख आहे.
वरुथिनी एकादशी व्रताची पूजा पद्धत
वरुथिनी एकादशीला, उपवास करणाऱ्या व्यक्तीने ब्रह्म मुहूर्तावर उठून स्नान करावे. यानंतर, घरातील पूजास्थळ स्वच्छ करा आणि भगवान विष्णूच्या मूर्तीसमोर दिवा लावा. पिवळ्या फुलांनी आणि चंदनाने देवाची पूजा करा. भगवान विष्णूला तुळशीची पाने, पंचामृत आणि फळे अर्पण करा. “ओम नमो भगवते वासुदेवाय” या मंत्राचा जप करा. संपूर्ण दिवस उपवास ठेवा. निर्जल उपवास हा सर्वोत्तम मानला जातो, परंतु तुम्ही गरजेनुसार फळे खाऊ शकता.
एकादशी व्रताचे नियम
एकादशीच्या दिवशी उपवास केला जातो. एकादशीच्या दिवशी काही पदार्थ खाऊ नयेत, असे सांगितले जाते. उपवास सोडण्यासाठी द्वादशी तिथीची वाट पाहावी लागते, उपवास सोडताना सात्त्विक पदार्थ, जसे फळे, दुग्धजन्य पदार्थ आणि भाज्या खाव्यात,उपवास भाताने सोडणे आवश्यक आहे, असे सांगितले जाते,वरूथिनी एकादशीच्या दिवशी व्रत सोडण्याची वेळ सकाळी 5:46 ते 8:23 पर्यंत आहे.
वरुथिनी एकादशीच्या दिवशी देवाला कोणते नैवेद्य प्रिय असतात?
वरुथिनी एकादशीला भगवान विष्णूला प्रसन्न करण्यासाठी, भक्त त्यांना आवडत्या गोष्टी अर्पण करतात. वरुथिनी एकादशीला भगवान विष्णूला दूध आणि दही अर्पण करणे विशेष शुभ मानले जाते, असे मानले जाते की यामुळे विष्णू आणि लक्ष्मी प्रसन्न होतात. वरुथिनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूला नैवेद्य म्हणून दूध, दही, साबूदाणा खीर किंवा साधे भात अर्पण केले जाते. तसेच, त्यांना गोड पदार्थ जसे बूंदीचे लाडू, बर्फी किंवा मोतीचूर देखील आवडतात.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)