घरात चुकूनही ‘या’ ठिकाणी बूट आणि चप्पल ठेवू नका, घरी येईल दारिद्र्य

वास्तुशास्त्रात बूट आणि चप्पल घरात ठेवण्याचे काही नियम आहेत. घरात बूट आणि चप्पल काढताना आणि ठेवताना कोणत्या गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे, याविषयी जाणून घेऊ.

हिंदू धर्मात वास्तुशास्त्राला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. वास्तुशास्त्रात केवळ घराची दिशाच सांगितली जात नाही तर घरात कोणती वस्तू कोणत्या दिशेने ठेवावी हे देखील सांगितले जाते. अशा परिस्थितीत, घरात बूट आणि चप्पल कोणत्या दिशेला आणि कुठे ठेवाव्यात याबद्दल वास्तुशास्त्रात अनेक नियम सांगितले आहेत. वास्तुशास्त्रानुसार, घरात प्रत्येक वस्तू ठेवण्यासाठी एक विशिष्ट दिशा असते. जेव्हा आपण घरात आपले बूट आणि चप्पल चुकीच्या दिशेने ठेवतो तेव्हा नकारात्मक ऊर्जा आपल्या घरात प्रवेश करते. यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा येऊ शकते, ज्यामुळे वादविवाद आणि भांडणे होऊ शकतात, असे म्हटले जाते. घरात बूट आणि चप्पल काढताना आणि ठेवताना कोणत्या गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे याविषयी जाणून घेऊया…

बूट आणि चप्पल उलटे ठेवू नये

वास्तुशास्त्रानुसार, घरात बूट आणि चप्पल उलटे ठेवल्याने किंवा विशिष्ट ठिकाणी ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा येते. यामुळे कुटुंबातील सुख-शांती भंग पावते. म्हणूनच बूट-चप्पल कधी उलटे ठेवू नयेत. यामुळे घरात गरिबी येते.

बूट आणि चप्पल कोणत्या दिशेला ठेवावेत?

वास्तुशास्त्रानुसार, घरात बूट आणि चप्पल नैऋत्य दिशेला किंवा दक्षिण/पश्चिम दिशेला ठेवावी. नैऋत्य दिशेला बूट आणि चप्पल ठेवल्याने घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते, असे मानले जाते. दक्षिण आणि पश्चिम दिशेला बूट आणि चप्पल ठेवल्याने घरात समृद्धी आणि स्थिरता येते. बूट आणि चप्पल उत्तर किंवा पूर्व दिशेला ठेवू नयेत, कारण या दिशा देवी लक्ष्मी आणि सकारात्मक ऊर्जेच्या संबंधित असल्याने, येथे बूट आणि चप्पल ठेवल्यास घरात नकारात्मक ऊर्जा येऊ शकते. 

बूट आणि चप्पल कुठे ठेवू नयेत? 

वास्तुशास्त्रानुसार, बूट आणि चप्पल कधीही बेडरूममध्ये ठेवू नयेत. असे केल्याने वैवाहिक जीवनात समस्या निर्माण होतात. तसेच पती-पत्नीमधील नात्यात तणाव वाढू शकतो. बेडरूम हे विश्रांती आणि शांततेचे स्थान आहे. बूट आणि चप्पल या नकारात्मक ऊर्जा आकर्षित करतात, ज्यामुळे शांतता भंग होऊ शकते. मुख्य दरवाजावर बूट-चप्पल ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करते, बूट आणि चप्पल कधीही मुख्य दरवाजाजवळ ठेवू नका. कारण येथूनच लक्ष्मीचा प्रवेश होतो.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News