बेडरूममध्ये चुकूनही ‘या’ गोष्टी ठेवू नका, वैवाहिक जीवनावर होतो नकारात्मक परिणाम!

बेडरूममध्ये 'या' वस्तू ठेवू नये, होऊ शकते नुकसान

हिंदू धर्मात वास्तुशास्त्राचे विशेष महत्त्व आहे. वास्तुशास्त्रात घराच्या बांधकामापासून ते घराच्या प्रत्येक कोपऱ्यापर्यंत सर्व गोष्टींचे  वर्णन केले आहे. वास्तुशास्त्रात असेही सांगितले आहे की कोणती वस्तू कोणत्या दिशेने ठेवावी. आज आपण विशेषतः बेडरूमशी संबंधित वास्तु नियमांबद्दल जाणून घेऊ. आज आम्ही तुम्हाला वास्तुशास्त्रानुसार बेडरूममध्ये कोणत्या गोष्टी ठेवू नयेत हे सांगणार आहोत. बेडरूममध्ये या गोष्टी ठेवल्याने वैवाहिक जीवनात समस्या निर्माण होऊ शकतात आणि पती-पत्नीमध्ये वाद होऊ शकतात.

देव-देवतांचे चित्र

चुकूनही बेडरूममध्ये धार्मिक पुस्तके ठेवू नयेत. या गोष्टी बेडरूममध्ये ठेवल्याने देव-देवतांचा अपमान होतो. धार्मिक पुस्तके नेहमीच मंदिरात ठेवली पाहिजेत. बेडरूममध्ये देव-देवतांच्या मूर्ती देखील ठेवू नयेत. असे केल्याने अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

पाण्याचे चित्र

वास्तुशास्त्रानुसार, बेडरूममध्ये समुद्र, धबधबा किंवा लाटा असलेल्या पाण्याचे चित्र लावणे अशुभ मानले जाते. हे चित्र नकारात्मक ऊर्जा निर्माण करते ज्यामुळे पती-पत्नीमधील नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो. पाण्याचा परिणाम सतत होत असतो आणि त्याचा थेट परिणाम आपल्या मनावर होतो. बेडरूममध्ये पाण्याचा फोटो असल्याने मन अस्वस्थ राहते आणि पती-पत्नीमधील अंतर वाढते. तसेच, हे चित्र निराशा निर्माण करू शकते. म्हणून, वास्तुनुसार, बेडरूममध्ये शांत आणि सकारात्मक वातावरण निर्माण करण्यासाठी, शांत निसर्गाचे चित्र किंवा फिकट रंगाचे चित्र लावणे चांगले असते. 

न वापरलेल्या इलेक्ट्रिक वस्तू

वास्तुशास्त्रानुसार, बेडरूममध्ये न वापरलेल्या विजेच्या वस्तू ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा निर्माण होते ज्यामुळे ताण आणि चिंता वाढते. बंद इलेक्ट्रिक वस्तू झोपेतअडथळा आणतात आणि वैवाहिक जीवनात कटुता निर्माण करू शकतात, म्हणून बेडरूम नेहमी नीटनेटकी, स्वच्छ आणि शांत ठेवावी. घरात सकारात्मक उर्जेचा प्रवाह चालू राहावा म्हणून खोलीतील न वापरलेल्या विजेच्या वस्तू  ताबडतोब काढून टाकाव्यात.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News