जयपुर: आयपीएल 2025 च्या हंगामातील 47 वा सामना आज गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स या संघांमध्ये खेळला जाणार आहे. जयपुरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर आज संध्याकाळी 7.30 वाजता हा सामना खेळला जाणार आहे. गुजरात टायटन्स आयपीएल प्ले ऑफ्सच्या वाटेवर आहे, संघ आज विजय मिळविण्यासाठी प्रयत्नशील असेल. दुसरीकडे राजस्थान रॉयल्सचं या आयपीएल सीझनमधील आव्हान जवळपास संपुष्टात आलं आहे.
राजस्थान की गुजरात कोण जिंकेल?
गुजरात टायटन्सने यंदाच्या आयपीएल सीझनमध्ये चांगली कामगिरी केली आहे. संघाने या सीझनमध्ये आतापर्यंत 8 सामने खेळले असून पैकी 6 सामन्यांमध्ये विजय संपादन केला आहे. त्यामुळे सध्या गुजरात टायटन्स आयपीएल गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहेत. संघाचा नेट रन रेट सध्या +1.14 आहे. आयपीएलमधील इतर संघांशी तुलना केली असता गुजरात टायटन्स आजच्या घडीला सर्वात सरस ठरत आहे. दुसरीकडे राजस्थान रॉयल्सची कामगिरी या सीझनमध्ये सुमार राहिली आहे. संघाने आतापर्यंत खेळलेल्या 9 पैकी अवघ्या 2 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. नेट रन रेटदेखील अगदीच घसरलेला असून संघ गुणतालिकेत सध्या नवव्या स्थानावर आहे.

दुसरीकडे दोन्ही संघातील आधीचा इतिहास विचारात घेतला असता लक्षात येते की, दोन्ही संघांमध्ये खेळल्या गेलेल्या शेवटच्या 7 सामन्यांपैकी गुजरात टायटन्सने 6 तर अवघ्या एका सामन्यात राजस्थानला विजय मिळवता आला आहे, ही बाब गुजरात टायटन्सनच्या पथ्यावर पडणारी अशीच आहे. अंदाजानुसार आजचा सामना गुजरात टायटन्स जिंकण्याची अधिक शक्यता आहे.
दोन्ही संघाचे प्लेयिंग इलेव्हन
गुजरात टायटन्स
साई सुदर्शन, शुभमन गिल (कॅप्टन), जोस बटलर (विकेटकीपर), शेरफेन रदरफोर्ड, राहुल तेवतिया, वॉशिंगटन सुंदर, शाहरुख खान, राशिद खान, रविश्रीनिवासन साई किशोर, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज
राजस्थान रॉयल्स
यशस्वी जायसवाल, वैभव सूर्यवंशी, नीतीश राणा, रियान पराग (कॅप्टन), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), शिम्रोन हेटमायर, शुभम दुबे, वानिंदु हसरंगा, जोफ्रा आर्चर, महेश तीक्षाना, संदीप शर्मा, तुषार देशपांडे, युद्धवीर सिंह चरक, कुमार कार्तिकेय, आकाश मधवाल, कुणाल सिंह राठौड़, फजलहक फारूकी, क्वेना मफाका, अशोक शर्मा