IPL 2025: आयपीएलमध्ये मुंबईचा लखनऊ विरुद्ध सनसनाटी विजय, चषक जिंकण्याची आशा पल्लवीत!

मुंबई इंडियन्सने लखनऊ सुपर जायंट्सच्या विरोधात मोठा विजय प्रस्थापित करत आयपीएलमधील आव्हान कायम ठेवलं आहे.

मुंबई: आयपीएल 2025 च्या या मोसमात मुंबई इंडियन्सच्या आयपीएल चषक जिंकण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत, त्याचे कारणही तसेच आहे. मुंबईने लखनऊ सुपर जायंट्सचा 54 धावांनी पराभव केला आहे. आयपीएल 2025 चा 45 वा सामना मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात खेळला गेला. जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखालील शानदार गोलंदाजीच्या कामगिरीमुळे मुंबई इंडियन्सने लखनौ सुपर जायंट्सचा 54 धावांनी पराभव केला.

मुंबई इंडियन्सची सांघिक कामगिरी

लखनऊने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, परंतु सूर्यकुमार यादव आणि रायन रिकलटन यांच्या अर्धशतकांच्या मदतीने मुंबईने 20 षटकांत सात बाद 215 धावा केल्या. त्यानंतर लखनऊ सुपर जायंट्स हा धावांचा डोंगर गाठणे भलतेच अवघड गेले, कारण मुंबईच्या गोलंदाजांनी केलेला भेदक मारा. लखनऊचा संघ 20 षटकांत 161 धावांवर सर्वबाद झाला. मुंबईकडून बुमराहने शानदार गोलंदाजी केली आणि चार षटकांत 22 धावा देत चार विकेट्स घेतल्या.

मागील सामन्यात लखनऊने 4 एप्रिलला एकाना स्टेडियममध्ये मुंबईवर 12 धावांनी मात केली होती. त्यानंतर आता मुंबईने लखनौवर विजय मिळवत पराभवाचा हिशोब बरोबर केला आहे. दुसरीकडे मुंबई गुणतालिकेत थेट दुसरे स्थान पटकावले आहे, 10 पैकी सहा सामने मुंबईने जिंकले आहेत, हा मुंबईचा सलग पाचवा विजय ठरला आहे,.

लखनऊच्या मिचेल मार्श, निकोलस पूरन, आयुष बदोनी आणि डेव्हिड मिलर या 4 विस्फोटक फलंदाजांना विजयी धावांचा पाठलाग करताना आश्वासक सुरुवात मिळाली होती. मात्र मुंबईच्या गोलंदाजांनी वेळ असतानाच या घातक फलंदाजांना आऊट करत मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. या चौघांव्यतिरिक्त लखनऊकडून एकाही फलंदाजांना मुंबईच्या गोलंदाजांनी काही करण्याआधीच रोखलं आणि सामन्यावर घट्ट पकड मिळवली.

कोणाच्या किती धावा, विकेट्स?

लखनऊच्या बदोनीने 35 धावांचं योगदान दिलं. मिचेल मार्श 34 धावा करुन आऊट झाला. निकोलस पूरन याने 27 रन्स केल्या. तर डेव्हिड मिलर 24 धावांवर बाद झाला. रवी बिश्नोई याने 2 षटकारांसह 13 धावा केल्या. या व्यतिरिक्त एकाही फंलदाजांना दुहेरी आकडा गाठता आला नाही. मुंबईकडून जसप्रीत बुमराहने याने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. बुमराहने 4 ओव्हरमध्ये 22 धावांच्या मोबदल्यात 4 विकेट्स घेतल्या. ट्रेंट बोल्ट याने तिघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. विल जॅक्स याने 2 विकेट्स घेत लखनौचं कंबरडं मोडलं. तर कॉर्बिन बॉश याने 1 विकेट घेत इतरांना चांगली साथ दिली. यामुळे आयपीएल गुणतालिकेच चित्र बदललं आहे. मुंबई संघाने आयपीएल प्ले ऑफ्सचा आपला मार्ग मोकळा केला आहे,


About Author

Rohit Shinde

Other Latest News