पुणे : तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या अडचणी संपण्याचे नाव घेत नाही. चौकशी समितीमध्ये रुग्णालयाला दोषी ठरवण्यात आले आहे. त्यानंतर तनिषा भिसे हिची वैद्यकीय माहिती अंतर्गत अहवालाच्या नावावर सार्वजनिक करण्यावर ठपका ठेवत महिला आयोगाने पुण्याचे पोलीस आयुक्त आणि महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल यांना तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत .
तनिषा हिची वैद्यकीय माहिती सार्वजनिक करण्याच्या विरोधात भिसे कुटुंब देखील पोलिसांमध्ये गेले आहे. पुण्यातील अलंकार चौकी पोलिस ठाण्यात दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या विरोधात त्यांनी तक्रार दिली आहे.

अंतर्गत अहवालावर डाॅ.धनंजय केळकर, डाॅ.अनुजा जोशी, डाॅ.समीर जोग, सचिन व्यवहारे, सुश्रुत घैसास यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. या सर्वांवर कारवाई करण्याची मागणी भिसे कुटुंबांनी आपल्या तक्रारीमध्ये केली आहे.
अंतर्गत अहवालामध्ये काय?
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाकडून तनिषा भिसे हिच्या मृत्यू प्रकरणी नेमलेल्या अंतर्गत समितीने रुग्णालयाची चूक नसल्याच्या निष्कर्ष काढला होता. तसेच तनिषाने गर्भधारणा IVF द्वारे केल्याचे सांगितले होते. तिची डिलिव्हरी धोक्याचे असल्याचे देखील म्हटले होते. केवळ रागापोटी त्या रुग्णालय सोडून दुसरीकडे गेल्याचेही अहवालामध्ये म्हटले आहे.
रुपाली चाकणकर काय म्हणाल्या?
महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ट्विट करत मंगेशकर रुग्णालया विषयी कारवाईची माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने तनिषा भिसे यांच्या मृत्यूनंतर केलेल्या अंतर्गत चौकशीचा अहवाल सार्वजनिक केला. मृत तनिषा आणि भिसे कुटुंबीयांची वैयक्तिक माहिती परवावरनगीविना सार्वजनिक केल्याने मानसिक त्रास झाल्याची तक्रार सविता भिसे यांनी राज्य महिला आयोगाकडे केली आहे. आयोगाने याप्रकरणी पुण्याचे पोलीस आयुक्त आणि महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलच्या अध्यक्षांना यावर तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिले असून आयोगास केलेल्या कार्यवाहीचा चौकशी अहवाल तात्काळ सादर करण्यास सांगितले आहे.
मंगेशकर रुग्णालयाच्या परिसरात जमावबंदी
आदीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या परिसरात रुग्णालयाच्या विरोधात विविध सामाजिक, राजकीय संघटनांकडून आंदोलने करण्यात येत आहेत. या आंदोलनामुळे सार्वजनिका वाहतूकीला अडथळा निर्माण होऊन वाहतूक कोंडी होत आहे. तसेच रुणालयात येणाऱ्या रुग्णांचे देखील हाल होत आहेत. या सर्वाची गंभीर दखल घेत पोलिसांनी मंगेशकर रुग्णालय परिसरात आंदोलनांना मज्जाव करत जमावबंद