मुंबई : माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी माझगाव कोर्टामध्ये करुणा शर्मा यांच्यासोबत अधिकृत लग्न झाले नसल्याचा दावा केला होता. करुणा शर्मा यांची जी मुले आहेत ती आपलीच असल्याची मात्र कबुली धनंजय मुंडे यांनी दिली होती. कोर्टाने करुमा शर्मा यांना घरगुती हिंसाचार प्रकरणात पीडिती असून त्यांना दोन लाख रुपयांची पोटगी दरमहा देण्याचा निर्णय दिला होता. या निर्णयाला मुंडे यांनी आव्हान दिले होते.
धनंजय मुंडे यांनी दिलेले आव्हान माझगाव कोर्टाने फेटाळले आहे. धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा एकाच घरात राहिल्याशिवाय त्यांना दोन मुलं होणे शक्य नाही, असे निरीक्षण देखील कोर्टाने नोंदवले. तसेच करुणा शर्मांसोबत आपले लग्न झाले नसल्याचा मुंडे यांचा दाव देखील कोर्टाने फेटाळत त्यांना खडे बोल सुनावली आहेत.

वांद्रे कोर्टाचा निर्णय कायम
करुणा शर्मा यांनी वांद्रे कोर्टात धनंजय मुंडे यांच्या विरोधात पोटगीसाठी दावा केला होता. वांद्रे कोर्टाने दरमहा दोन लाख रुपये पोटगी देण्याचा निर्णय दिला होता. तर, धनंजय मुंडे यांना हा निर्णय मान्य नव्हता. तर करुणा मुंडे यांना देखील पोटगीचे रक्कम वाढवून हवी होती. माझगाव कोर्टात या प्रकरणी सुनावणी झाली. माझगाव कोर्टाने दोन लाख रुपये पोटगी देण्याचा वांद्रे कोर्टाचा निर्णय देत धनंजय मुंडेंना मोठा झटका दिला.
धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप
करुणा शर्मा यांनी मीडियासोबत बोलताना धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. आपल्याला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून लग्न करणाऱ्याला धनंजय मुंडे हे 50 कोटी रुपये देणार होते. तसेच त्यांनी मला देखील 50 कोटी रुपये घे आणि दुबईला निघून जा अशी ऑफर दिली होती, असे देखील करुणा मुंडे यांनी म्हटले होते.
लग्न झाल्याचे पुरावे दिले
धनंजय मुंडे यांच्याकडून करुणा मुंडे यांच्यासोबत लग्न झाले नसल्याचा दावा करण्यात आला होता. त्यावर करुणा मुंडे यांना लग्न झाल्याचे पुरावे कोर्टात सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्याप्रमाणे करुणा मुंडे यांनी कोर्टामध्ये पुरावे सादर केले. त्यामध्ये पासपोर्टवर पती म्हणून धनंजय मुंडे यांचे नाव असलेले कागदपत्रे तसेच पत्नी म्हणून धनंजय मुंडे यांनी पाॅलिसमध्ये करुणा शर्मा यांचे नाव लावले असलेले कागपत्र सादर करण्यात आले.