मुंबई: तुम्ही अनेकदा अनेक लोकांना तक्रार करताना ऐकले असेल की त्यांचा स्मार्टफोन वेळोवेळी गरम होतो. खरंतर स्मार्टफोनमध्ये गरम होण्याची समस्या सामान्य आहे, पण जास्त गरम होणे देखील धोकादायक आहे. कारण त्यामुळे फोनचा स्फोट होण्याचा धोका असू शकतो. अथवा पेच देखील घेऊ शकतो. आता तुमचा फोन सामान्य तापमानात कसा ठेवू शकता याबाबत काही टीप्स आणि ट्रिक्स समजून घेऊयात
मोबाईल कशामुळे गरम होतो?
वाढत्या उन्हात फोन लवकर गरम होतो. कधीकधी अनेक वेगवेगळे अॅप्स चालवल्यामुळे फोन गरम होऊ शकतो. त्याच वेळी, व्हिडिओ स्ट्रीमिंग किंवा जास्त वेळ गेम खेळल्याने CPU आणि GPU वर दबाव येतो. यामुळे फोन गरम होतो. जर तुम्ही तुमच्या फोनची ब्राइटनेस जास्त ठेवली असेल, तर त्यामुळे तो गरम होऊ शकतो. हानिकारक सॉफ्टवेअरचा फोनवर वाईट परिणाम होतो आणि फोन गरम होतो. आपल्याला आपला फोन चार्ज करण्यासाठी कोणाकडूनही चार्जर मागण्याची सवय आहे, फोन गरम होण्याचे हे एक मोठे कारण आहे, दुसऱ्या फोनच्या चार्जरने फोन चार्ज केल्याने जास्त गरम होण्याची समस्या उद्भवते.

काय उपाय करावेत?
सर्वात महत्वाचं म्हणजे मोबाईल तीब्र सूर्यप्रकाशापासून दूर ठेवावा. गरज नसेल तेव्हा स्क्रीनची ब्राइटनेस कमी ठेवावी. आवश्यक नसलेले अॅप्स बंद करा, फोन चार्ज करताना चार्जर वापरा, गरज नसल्यास फोनचे ब्लूटूथ, जीपीएस इत्यादी बंद ठेवा. जर तुम्ही बराच वेळ गेमिंग किंवा स्ट्रीमिंग करत असाल तर प्रोसेसर थंड होण्यासाठी मध्येच ब्रेक घ्या. अशा प्रकारे काळजी घेतल्याने तुमचा मोबाईल ओव्हर हिटिंगपासून दूर राहिल. आणि परिणामी तो फुटणे किंवा पेट घेण्याचा धोका राहणार नाही.