चेन्नई ‘फुसका बार’, कोलकत्त्याच्या दणदणीत विजय ,सुनील नारायण चमकला

कोलकत्ता संघाने आपले धडाकेबाज सुरुवात केली. ओपनर फलंदाज सुनील नारायण हा 44 धावा काढून बाद झाला.

चेपाॅक  : मॅच आणि मैदान बदललेल तरी चैन्नई सुपर किंग्जचा हरवलेला सूर काही केल्याने सापडत नाही. कोलकत्ता नाईट रायडर विरुद्ध प्रथम बॅटींग करताना चैन्नई सुपर किंग्ज संघ अवघ्या 103 धावा करू शकला. 104 धावांचे लक्ष घेऊन मैदानात उतरलेला कोलकत्ताने अवघ्या 8 ओव्हरमध्ये आणि दोन चेंडूत हे लक्ष्य गाठले अन् चैन्नईचा आठ फलंदाज बाकी ठेऊन विजय मिळवला

प्रथम फलंदाजी करणाऱ्या चेन्नईच्या तब्बल सात फलंदाजांना दुहेरी धावसंख्या देखील गाठता आली नाही. विशेष म्हणजे एकामागून एक फलंदाज बाद होत असताना कर्णधार महेंद्र सिंग धोनी ९ व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला आणि अवघ्या एका धावेवर बाद झाला.

नारायण ठरला कर्दनकाळ

कोलकत्ताचा फिरकी गोलंदाज सुनील नारायण याने अवघ्या 13 धावा देत तीन फलंदाजांना बाद केले. महेंद्र सिंग धोनी, त्रिपाठी आणि रवींद्र जडेजा या महत्त्वाच्या तीन विकेट त्याच्या खात्यात गेल्या. हर्षित राणा आणि वरुण चक्रवती यांनी प्रत्येक दोन दोन फलंदाजांना बाद केले.

शिवम-शंकरचा संघर्ष

चेन्नईचे फलंदाज एकामागून एक बाद होत असताना चौथ्या क्रमांकावर आलेला विजय शंकर याने 29 आणि पाचव्या क्रमांकावर आलेला शिवम दुबे याने 31 धावा केल्या. या दोघांच्या या छोट्या खेळ्यांमुले चेन्नईला 100 चा टप्पा पार करता आला.

कोलकत्त्याची धडाकेबाज सुरूवात

कोलकत्ता संघाने आपले धडाकेबाज सुरुवात केली. ओपनर फलंदाज सुनील नारायण याने तीन फलंदाजांना बाद करत गोलंदाजीमध्ये चमक दाखवली होती. त्यानंतर फलंदाजीमध्ये देखील अवघ्या 13 बाॅल्समध्ये 44 धावा काढून तो बाद झाला. तर डिकाॅक 23 धावांवर बाद झाला मात्र, तोपर्यंत विजय त्यांच्य दृष्टिक्षेपात आला होता. कर्णधार अजिंक्य राहणे 20 धावांवर नाबाद राहिला.


About Author

Arundhati Gadale

Other Latest News