के.कस्तुरीरंगन यांच्या निधनाने इस्रोला मोठा धक्का, कोण होते के. कस्तुरीरंगन?

इस्रोचे माजी अध्यक्ष के. कस्तुरीरंगन यांचे निधन झाले आहे...

बंगळुरू: गेल्या काही वर्षांत भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात इस्रोने मोठी भरारी घेतली. अनेक मोहिमा यशस्वी झाल्या, जगात आणि अवकाशात भारताची ताकद वाढली. या मोहिमांना बळ आणि प्रोत्साहन देणारा अवलिया आता हरपला आहे. इस्रोचे माजी अध्यक्ष के.कस्तुरीरंगन याचे बंगळुरू येथे निधन झाले आहे.

इस्रोच्या माजी अध्यक्षांचं निधन

इस्रोचे माजी प्रमुख डॉ. के. कस्तुरीरंगन यांचे आज बंगळुरू येथील त्यांच्या राहत्या घरी सकाळी 10.43 वाजता निधन झाले. डॉ. के. कस्तुरीरंगन यांचा जन्म 24 ऑक्टोबर 1940 रोजी झाला आहे. इस्रोचे माजी प्रमुख डॉ. के. कस्तुरीरंगन यांनी इस्रोमध्ये अध्यक्ष आणि सचिव म्हणून 9 वर्षांहून अधिक काळ भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे नेतृत्व केले. या काळात त्यांनी अनेक मोठ्या अवकाश मोहिमांचा कारभार पाहिला होता.

तसेच डॉ. कस्तुरीरंगन यांनी मुंबई विद्यापीठातून भौतिकशास्त्रात बॅचलर ऑफ सायन्स आणि मास्टर ऑफ सायन्स पदवी प्राप्त केली. त्याचसोबत 1971 मध्ये अहमदाबादमधील भौतिक संशोधन प्रयोगशाळेतून प्रायोगिक उच्च ऊर्जा खगोलशास्त्रात पदव्युत्तर मिळवली. आज त्यांनी त्यांच्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला असून त्यांचे पार्थिव बंगळुरू येथे अंत्यदर्शनासाठी ठेवले होते. कस्तुरीरंगन यांच्या जाण्याने भारतीय अवकाश संशोधन क्षेत्रातील मोठा अवलिया हरवल्याची भावना व्यक्त केली जात आहे. डॉ. के. कस्तुरीरंगन हे प्रसिद्ध भारतीय खगोलशास्त्रज्ञ होते. त्याचसोबत त्यांनी भारताच्या अंतराळ योजनेत त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे, 

जागतिक पातळीवर काम

के. कस्तुरीरंगन आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र संघ, आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र अकादमीसह विविध आंतरराष्ट्रीय समित्या आणि संघटनांचे सदस्य देखील राहिले होते. डॉ. के. कस्तुरीरंगन यांना पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण यांसारख्या प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. एवढचं नाही तर इंडियन अकादमी ऑफ सायन्सेस, इंडियन नॅशनल सायन्स अकादमी आणि थर्ड वर्ल्ड अकादमी ऑफ सायन्सेससह विविध वैज्ञानिक अकादमी आणि संघटनांनी देखील त्यांना सन्मानित केले आहे. अवकाश संशोधन क्षेत्रात त्यांचे मोठे नाव होते.


About Author

Rohit Shinde

Other Latest News