कर्नल सोफियांबाबत वादग्रस्त वक्तव्य प्रकरणात मंत्री विजय शाह यांची अद्याप चौकशी नाही, कारण काय?

मध्यप्रदेशचे मंत्री विजय शाह यांनी कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे मोठा वादंग निर्माण झाला होता. सर्वोच्च न्यायालयानेही त्यांच्यावर कडक शब्दात टीका केली होती.

नवी दिल्ली – कर्नल सोफिया कुरैशी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य प्रकरणी वादात सापडलेले मध्यप्रदेशचे मंत्री विजय शाह यांच्या प्रकरणावर आता जुलैत सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. बुधवारी या प्रकरणात दिल्लीत न्यायमूर्ती जेजे सूर्यकांत आणि दीपांकर दत्ता यांच्यासमोर सुनावणी झाली.

न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले की, एसआयटीने या प्रकरणी २१ मे रोजी चौकौशी केली. ज्या ठिकाणी वादग्रस्त वक्तव्य करण्यात आलं होतं, त्या ठिकाणी एसआयटीनं चौकशी केली. मोबाईलसह काही पुरावे त्यांनी ताब्यात घेतले आहेत. काही साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले आहे. तपास सध्या प्राथमिक पातळीवर आहे. मध्य प्रदेश हायकोर्टाला विनंती आहे की, त्यांनी सुप्रीम कोर्टासोबत सुनावणी करावी.

एसआयटीनं ठरलेल्या तारखेला तपास अहवाल सादर केला आणि या प्रकरणात आणखी मुदतीची मागणी केली. आता या प्रकरणाची सुनावणी जुलैच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे.

मंत्री शाह यांची अद्याप चौकशी नाही

सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर या प्रकरणी 19 मे रोजी एसआयटी स्थापित करण्यात आली होती. एसआयटीत आयजी सागर रेंज प्रमोद वर्मा, डीआयडी एसएएफ कल्याण चक्रवर्ती आणि एसपी वाहिनी सिंह यांचा समावेश आहे. आश्चर्याची बाब म्हणजे सहा दिवस केलेल्या एसआयटीच्या तपासात मंत्री विजय शाह यांची चौकशी अद्याप करण्यात आलेली नाही.

कर्नल सोफिया यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा मंत्री महोदयांचा व्हिडीओचं मोठा पुरावा असल्याचं सांगण्यात येतंय. त्यानंतर त्यांनी तिनदा माफी मागितल्याचा व्हिडीओ जारी केला होता. यातून त्यांनी वादग्रस्त विधान केल्याचं स्पष्ट होतंय.

हायकोर्टाच्या आदेशानंतर प्रकरणात एफआयआर

मध्यप्रदेशच्या हायकोर्टानं 14 मे रोजी मंत्री शाह यांच्या वक्तव्याची दखल घेत एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर इंदूरमध्ये या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला. त्याविरोधात शाह सुप्रीम कोर्टात गेले आहेत.


About Author

Smita Gangurde

Other Latest News