कोलकाता: आजच्या काळात लग्न, घटस्फोट या घटना अगदी सातत्याने आणि कोणत्याही वयात घडताना दिसून येत आहे. पश्चिम बंगालमधून आता अशीच एक लग्नाची बातमी समोर येत आहे. भाजप नेते दिलीप घोष वयाच्या 60 व्या वर्षी लग्न बंधनात अडकणार आहेत.
रिंकी मजूमदारसोबत विवाह
दिलीप घोष भाजप प्रदेशाध्यक्ष असताना एका कार्यक्रमात त्यांची होणारी पत्नी रिंकी मजूमदार यांच्याशी ओळख झाली होती. त्यावेळी दिलीप घोष यांच्या आग्रहानंतर रिंकी मजूमदार भाजपमध्ये दाखल झाले. 2021 मध्ये रिंकी मजूमदार आणि दिलीप घोष यांच्यात मैत्री झाली होती. रिंकी मजूमदार भाजप पक्षाच्या सक्रीय कार्यकर्त्या असल्याची माहिती समोर येत आहे. अगदी थोडक्यात कमी लोकांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा पार पडतोय.

दिलीप घोष 19 वर्षाचे असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सहभागी झाले होते. आता 41 वर्षानंतर आईच्या आग्रहामुळे ते लग्न करणार आहेत. दिलीप घोष यांची होणारी पत्नी रिंकी मजूमदार भाजप कार्यकर्ता आहे. त्यांनी महिला मोर्चाची जबाबदारी सांभाळली आहे.
रिंकी मजूमदार बद्दल थोडक्यात
रिंकी मजूमदार या 50 वर्षांच्या आहेत. त्यांचा घटस्फोट झाला आहे. त्यांना एक 25 वर्षांचा मुलगा असून तो आयटी उद्योगात नोकरीला आहे. रिंकी मजूमदार यांनी राजकीय क्षेत्रात देखील कार्य केले आहे. राजकारणाचा चांगला अनुभव रिंकी यांना आहे.
घोष -मजूमदार प्रेम कहाणी
दिलीप घोष भाजपाचे प्रदेशाध्यक्ष असताना एका कार्यक्रमात त्यांची रिंकी मजूमदार यांच्याशी ओळख झाली होती. त्यावेळी दिलीप घोष यांच्या आग्रहानंतर रिंकी मजूमदार भाजपमध्ये दाखल झाले. 2021 मध्ये रिंकी मजूमदार आणि दिलीप घोष यांच्यात मैत्री झाली होती. या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. 2024 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत दिलीप घोष यांचा पराभव झाला. त्यानंतर ते नैराश्यात आले. त्यावेळी रिंकी मजूमदार यांनी दिलीप घोष यांना सावरले. त्यांच्यासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला. दिलीप घोष यांनी त्यावेळी लग्न करण्यास नकार दिला. परंतु त्यानंतर आईच्या आग्रहामुळे त्यांनी लग्न केले.