दक्षिणेत भाजपची मोठी खेळी! AIADMK सोबत अमित शहांनी केली युतीची घोषणा, निवडणुकीची रणनीतीही ठरली

चैन्नई ः उत्तर भारतामध्ये एकतर्फी वर्चस्व असलेला भाजप दक्षिण भारतामध्ये आपले पाय रोवण्यासाठी संघर्ष करतो आहे. कर्नाटकमध्ये भाजपने यश मिळवले आहे. मात्र, तमिळनाडूनमध्ये भाजपच्या अस्तित्वाची लढाई सुरू आहे. यामध्ये आगामी विधानसभा निवडणुकीचा विचार करून अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम (AIADMK ) सोबत युती करण्याची घोषणा गृहमंत्री अमित शहा यांनी केलआहे.

चैन्नईमध्ये आज (शुक्रवारी) अमित शहांनी एआयएडीएमकेसोबत भाजपच्या युतीची घोषणा केली. तसेच 2026  मध्ये होणाऱ्या तमिळनाडू विधानसभेची निवडणूक एआयएडीएमकेचे प्रमुख एडाप्पाडी पलानीस्वामी यांच्या नेतृत्वाखाली लढणार असल्याचे जाहीर केले.

लोकसभा निवडणुकीत एआयएडीएमके आणि भाजप स्वतंत्र लढले होते. मात्र, स्वतंत्र लढून 39 लोकसभेच्या जागांपैकी एकही जागा दोघांना मिळू शकली नाही. इंडिया आघाडीने या राज्यात एकतर्फी वर्चस्व मिळवले. विशेष करून एम के स्टॅलिन यांच्या डीएमकेने तब्बल 22 जाागांवर तर काँग्रेसने 9 जागांवर विजय मिळवला होता.

विधानसभेची रणनीती ठरली

अमित शाह यांनी भाजप-एआयएडीएमके युतीची आगामी विधानसभेची रणनीती ठरवली आहे. यामध्ये डीएमकेच्या भ्रष्टाचारावर हल्लाबोल करत दलित आदिवासींवर होणाऱ्या अन्यायाच्या मुद्यावर ही निवडणूक लढली जाणार असल्याचे शहा म्हणाले.

2021 च्या विधानसभा निवडणुकीत अपयश

एआयएडीएमके-भाजपची 2021 च्या विधानसभा निवडणुकीत युती केली होती. मात्र त्यांना 234 जागांपैकी अवघ्या 75 जागा मिळाल्या होत्या.  विधानसभेतील अपयशानंतर या 2024 च्या लोकसभा निवडणुकीत स्वतंत्र लढून देखील त्यांना यश मिळाले नाही. त्यातच तत्कालीन भाजपचे प्रदेशाध्यक्ष अन्नामलाई यांच्या स्वबळाच्या घोषणेमुळे तसेच एआयडीएमके विरोधात केलेल्या वक्तव्यांमुळे दोघांमधील युतीची शक्यता मावळली होती.

टीव्हीकेचे आव्हान

तमिळनाडूतील प्रसिद्ध अभिनेता विजय याने तमिलगा वेत्री कळघम (TVK) या भाषाची स्थापना केली आहे. मुख्यमंत्री ए के स्टॅलिन यांच्या विरोधात तो भूमिका घेत आहे. त्यामुळे तो एआयडीएमके-भाजपच्या युतीमध्ये येणार की नाही हे अजुन स्पष्ट नाही. मात्र, विजयचे धोरण पाहिले असता तो डीएमके आणि एआयडीएमकेपासून अंतर राखून आहे. तमिळनाडूच्या जनतेसमोर त्याला तिसरा पर्याय म्हणून उभे राहायचे आहे.


About Author

Arundhati Gadale

Other Latest News