Gold Silver: सोने- चांदीच्या दरांत चढउतार; विक्री की खरेदी काय करावं?

सोने चांदीच्या दरात मोठ्या प्रमाणात चढ उतार पाहायला मिळतोय. गेल्या तीन दिवसांपूर्वी कमी होणारे दर आता पुन्हा वाढत आहेत. त्यामुळे सोने खरेदी करावे की विक्री करावी याबाबत गुंतवणूकदार संभ्रमात...

मुंबई; सोने चांदीच्या दरामध्ये देशात सध्या मोठी अस्थिरता पाहायला मिळत आहे. गेल्या तीन ते चार दिवसांपूर्वी दरांत मोठी घसरण होत होती. सोने 89 हजारांपर्यंत पोहोचले होते. आता पुन्हा सोने 95 हजार प्रति तोळा झाले आहे. परिणामी सोन्याची विक्री करावी की खरेदी याबाबत ग्राहक आणि गुंतवणूकदार मोठ्या संभ्रमात असल्याचं चित्र आहे.

गेल्या 24 तासांत मुंबईच्या सराफा बाजारातील सोने आणि चांदीचे दर चढत राहीले आहेत. सोन्याच्या दरात सारखा बदल होत असल्याने ग्राहकांना नेमके काय करावे हे समजत नाही. मोठ्या प्रमाणात होत असलेल्या दरबदलामुळे सोन्याची खरेदी करावी की मोड करावी या विचारात ग्राहक सापडले आहेत. तर गेल्या 4 दिवसांत दर घसरल्याने अनेक ग्राहकांनी सोनं विकल्याचं समोर आलं होतं.

सोन्याची पुन्हा उसळी:

एकीकडे जागतिक बाजारपेठेत अमेरिकच्या टॅरिफच्या निर्णयाने खळबळ माजली असताना जळगावच्या सराफ बाजारात सोन्या – चांदीच्या दरात पुन्हा मोठी वाढ झाली असून दराने उच्चांकी गाठली आहे. गेले काही दिवस सोन्याच्या दरात मोठी चढ-उतार होत आहेत.जळगावात गेल्या 24 तासात सोन्याच्या दरात 1 हजार रुपयांनी तर चांदीच्या दरात तब्बल 1500 रुपयांनी वाढ झाली आहे. परिणामी गुंतवणूक काढून घेणारे ग्राहक आता सावध झाले आहेत. आजच्या घडीला मुंबई सराफा बाजारात सोन्याचे एका तोळ्याचे ( 10 ग्रॅम ) दर GST सह 95 हजार 900 रुपये तर एक किलो चांदीचे दर 99 हजार रुपयांवर पोहोचले आहेत.

सोनं खरंच 55 हजार होणार?

काही अमेरिकन विश्लेषकांच्या सोनं आगामी काळात प्रति तोळा 10 ग्रॅम 55 हजारांपर्यंत घसरू शकत असा अंदाज वर्तवला जात होता. परिणामी दर घसरू लागल्यावर काही ग्राहकांनी सोने विकले, काही गुंतवणूकदारांनी गुंतवणूक देखील काढून घेतली. परंतु आता दर पुन्हा वाढले आहेत. त्यामुळे विक्री करायची की खरेदी याबाबत अनेकजण सध्या संभ्रमात असल्याचं चित्र आहे. पण एकून परिस्थिती पाहता सोन्याचे दर फार खाली जातील असं वाटत नाही. याबाबत भारतातील सराफा व्यावसायिक दर 85 हजारांच्या खाली जाणार नाहीत असं सांगत आहेत.


About Author

Rohit Shinde

Other Latest News