कोल्हापूर: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टींनी थकीत एफआरपी बिलांवरून कारखानदारांना इशारा दिला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे एफआरपीचे 137 कोटी कारथानदारांकडे थकीत आहेत. साखरेचे टेंडर्स सध्या 4500 दराने सुरू आहेत. त्यामुळे साखर कारखानदारांनी इमानदारीने एफआरपीवरती पैसे द्यावेत, आम्ही 15 टक्के व्याजासह हे पैसे घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिला आहे. जास्तीत जास्त काटा मारून रिकव्हरी चोरण्याचे काम प्रत्येक साखर कारखानदार करत असल्याचा आरोपही राजू शेट्टी यांनी केला. दुसरीकडे काही शेतकतऱ्यांची ऊसाची बिलेच मिळाली नाहीत, त्यावरही राजू शेट्टी यांनी संताप व्यक्त केला आहे.
नेमका प्रकार काय?
बहुतांश साखर कारखान्यांनी शेवटच्या दोन आठवड्यांतील शेतकऱ्यांची बिले दिलेली नाहीत. त्या या बिलांची थकबाकी राहिले आहे. नुकतीच या संदर्भात राजू शेट्टी आणि त्यांच्या शिष्टमंडळाने साखर आयुक्तांची भेट घेऊन हे पैसे आम्हाला व्याजा सकट मिळायला पाहिजेत, अशी मागणी केली असल्याची माहिती समोर येत आहे. साखर कारखान्याकडून हे पैसे मिळाले नाही तर त्यांच्यावर इन्कम टॅक्स अंतर्गत कारवाई करावी अशी मागणी साखर आयुक्तांकडे केली असल्याचे राजू शेट्टींनी स्पष्ट केले आहे. जास्तीत जास्त काटा मारून रिकव्हरी चोरण्याचे काम प्रत्येक साखर कारखानदार करत आहे. असा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे.

साखर कारखानदारांना इशारा
घोटाळेबाज साखर कारखानदारांना राजू शेट्टींनी एक गंभीर इशारा देखील दिला आहे. “येत्या काळात आम्ही इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला भेटून प्रत्येक कारखान्याकडे 500 टनापेक्षा जास्त ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांची यादी मागून घेणार असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. खरोखरच त्या शेतकऱ्याचे ऊसाचे क्षेत्र इतके मोठे आहे का? हे तपासण्यास सांगणार असल्याचे त्यांनी सांगितले. संबंधित शेतकऱ्यांचे जमिनीचे क्षेत्र 500 टनापेक्षा जास्त नसेल तर त्याने साखर कारखान्याला दिलेला ऊस कुठून आणला? त्यांनी घातलेला ऊस काटा मारलेला आहे का? हे तपासता येणार आहे. ”
हा सरळसरळ मनी लॉन्डरिंगचान प्रकार असल्याचे मत राजू शेट्टी यांनी व्यक्त केले आहे…त्यामुळे आगामी काळात थकीत एफ आरपी आणि मूळ बिलांबाबत राजू शेट्टी आक्रमक भूमिका घेण्याची शक्यता आहे. कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यातील बहुतांश साखर सम्राटांनी शेतकऱ्यांचे ऊसाचे पैसे थकवले आहेत. त्यावरून आता स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाल्याचे चित्र आहे.