Bank Loan: तात्काळ बँक लोन पाहिजे, मग ‘या’ गोष्टी करा

तुम्हाला दर तात्काळ बँक लोन मिळवायचे असेल, तर काही गोष्टींची विशेष काळजी घ्यावी लागते, जाणून घेऊयात सविस्तर

मुंबई: बँकेतून कर्ज मिळवण्यासाठी सर्वात महत्वाच्या असणाऱ्या दोन गोष्टी म्हणजे तुमचा सिबिल स्कोअर आणि तुमचा उत्पनाचा स्त्रोत. या दोन गोष्टी पाहून तुम्हाला किती कर्ज द्यायचे, द्यायचे की नाही याचा निर्णय बँका घेत असतात. त्यामधील तुमचा उत्पन्नाचा स्त्रोत हा व्यक्तीपरत्वे बदलणार मुद्दा आहे, मात्र सिबिल स्कोअर ही अत्यंत महत्वाची गोष्टी आहे, हा सिबिल स्कोअर चांगला ठेवण्यासाठी तुम्ही प्रयत्नशील असले पाहिजे.

सिबिलचं महत्व आणि सिबिल म्हणजे काय?

बँकांकडून कर्ज घेण्यापूर्वी आपल्या सिबिल स्कोअरची माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. सिबिल स्कोअर 300 ते 900 अंकांपर्यंत असतो. या दरम्यान असलेला आकडा तुम्ही कर्ज घेण्यास योग्य व्यक्ती आहात की नाही हे ठरतं. आपलं जुनं कर्ज, क्रेडिट कार्ड बिल आधारावर ही संख्या निश्चित केली जाते. जर तुम्ही कार्ड आणि कर्जाची रक्कम योग्य वेळेत भरली असेल तर  सिबिल स्कोअर चांगला होतो. जर यात काही चूक झाली तर मात्र त्याचा थेट फटका सिबिल स्कोअरवर होतो. त्यामुळे सिबिल स्कोअर खराब होऊ नये याची प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक आहे.

असा जपा सिबिल

कर्जाचे हप्ते वेळेत भरा

तुमच्या कर्जाचा हप्ता  चुकला तर त्याचा थेट परिणाम सिबिलवर होतो. यामुळे सिबिल स्कोअर कमी होतो. त्यातही एकापेक्षा जास्त ईएमआय भरणं राहून गेलं तर मग सिबिल स्कोअर खूपच खराब होतो. अशा स्थितीत बँका लोन देत नाहीत. कर्ज भरेल की नाही याची धास्ती बँकांना लागते. म्हणून घेतलेल्या कर्जाचे हप्ते वेळेवर भरावेत.

अनेक बँकांचे कर्ज नको

एखादी व्यक्ती कर्जासाठी वेगवेगळ्या बँकांमध्ये अर्ज करते आणि कमी व्याजदराने कर्ज मिळेल तेथून घेते. पण तुम्ही जेव्हा अनेक बँकांमध्ये कर्जासाठी अर्ज करता तेव्हा तुमचा सिबिल स्कोअर प्रत्येक बँकेकडून तपासला जातो. ही प्रक्रिया कठोर चौकशी अंतर्गत घडते. बँक किंवा एनबीएफसी तुमचा क्रेडिट स्कोअर तपासतात तेव्हा त्याला हार्ड इन्क्वायरी म्हणतात.

क्रेडीट कार्डचा परिणाम

तुम्ही क्रेडिट कार्ड वापरून मोठी खरेदी केली तर तु्मच्या सिबिलवर परिणाम होतो. त्यामुळे खरेदीसाठी तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्ड मर्यादा 30 टक्क्यांपेक्षा कमी रक्कम वापरावी. नाही तर तुमच्या सिबिल स्कोअरवर परिणाम होईल.

 


About Author

Rohit Shinde

Other Latest News