लाडक्या बहिणीचा एप्रिलचा महिन्याचा हप्ता कधी येणार? ‘या’ शूभ मुहूर्तावर खात्यात पैसे जमा होणार

आनंदाची बातमी! लाडक्या बहिणींना लवकरच मिळणार एप्रिल महिन्याचा हफ्ता...

मुंबई – महायुतीने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना विधानसभा निवडणुकीपूर्वी आणली होती. ही योजना महायुतीसाठी निवडणुकीत गेमचेंजर ठरली आहे. महायुतीने लाडक्या बहिणीना 2100 रुपयाचे आश्वासन दिले होते. मात्र एप्रिल महिन्याचा हप्त्या कधी येणार असा सवाल लाडक्या बहिणींतून विचारला जात होता. पण एप्रिल महिन्याच्या हफ्ताबाबत माहिती समोर येत आहे.

‘या’ दिवशी येणार पैसे…

दरम्यान, लाडकी बहीण ही योजनेला राज्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे. ही योजना सुरु झाल्यापासून एकूण 9 हप्ते लाडक्या बहिणीच्या खात्यात सरकारने जमा केले आहेत. तसेच 2100 रुपये कधी मिळणार असाही प्रश्न विचारला जात असताना, आता एप्रिल महिन्याचा हप्ता कधी येणार? याचे उत्तर समोर आले आहे.  30 एप्रिल रोजी म्हणजे अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर लाडक्या बहिणीच्या खात्यात पंधराशे रुपये जमा होणार आहेत. अशी माहिती महिला व बालविकास विभागाकडून देण्यात आली आहे.

लाभार्थी महिलांची संध्या वाढली…

दुसरीकडे जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेतील अर्ज पडताळणी करण्यात आली होती. निकषात, नियमात बसत नाहीत. अशा अर्जदारांना अपात्र ठरवण्यात आले होते. जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात असे एकूण 9 लाख महिलांना या योजनेतुन अपात्र ठरवण्यात आले होते. मात्र मार्च महिन्यात अर्ज पडताळणी करण्यात आलेली नाही. त्यामुळे 6 लाख महिलांना याचा लाभ मिळाला आहे. मार्च महिन्यात 2 कोटी 46 लाख महिलांनी या योजनेचा लाभ मिळाला आहे. त्यामुळे 6 लाख महिला अधिकच्या वाढल्याची माहिती समोर आली आहे. दुसरीकडे अर्ज पडताळणीसाठी राज्य शासनाने आयकर विभागाला पत्र पाठवले होते. परंतु आयकर विभागाकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. आयकर विभागाने कोणत्याही अर्जाची पडताळणी केली नाही.


About Author

Astha Sutar

Other Latest News