नाशिक: नाशिककरांसाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे. ऐन पावसाळ्यात आता नाशिककरांना पाणी कपातीचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे ही एक मोठी अडचण नाशिकरांसमोर उभी ठाकली आहे. नाशिक महानगरपालिकेने शनिवारी, 21 जून रोजी शहराच्या अनेक भागांत पाणीकपातीची घोषणा केली आहे. यामुळे नाशिककरांना शनिवारी दिवसभर जलसंकटाचा सामना करावा लागणार आहे.
जलशुध्दीकरण केंद्रांच्या दुरूस्तीची कामे
महानगरपालिकेच्या विविध जलशुद्धीकरण केंद्रांमध्ये नवीन व्हॉल्व्ह बसवणे तसेच इतर कामे हाती घेण्यात आली आहेत. यामुळे शहरात शनिवारी (21 जून) सकाळी 9 ते सायंकाळी 6 या वेळेत पाणीपुरवठा बंद राहणार आहे. रविवारी (22 जून) सकाळचा पाणीपुरवठा कमी दाबाने करण्यात येणार असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाचा वतीने कळवण्यात आले आहे. त्यामुळे दोन दिवस पाण्याची टंचाई राहू शकते.

स्मार्ट सिटीअंतर्गत महानगरपालिकेच्या ठिकठिकाणचे जलशु्द्धीकरण केंद्र व बुस्टर पंपिंग स्टेशन येथे विविध विकासकामे सुरू करण्यात आली आहेत. त्यानुसार स्मार्ट सिटी कंपनीने नवीन व्हॉल्व्ह व फ्लोमीटर्स बसवण्याचे काम हाती घेण्यात येणार आले. या कामासाठी शटडाऊनची मागणी केली जात आहे. ही कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी शनिवारी दिवसभर शटडाऊन अर्थात पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच रविवारी सकाळ्या सत्रातील पाणीपुरवठा कमी दाबाने केला जाणार आहे.
नाशिककरांनो, पाणी जपून वापरा
पावसाळ्यात नागरिकांना पाणीची समस्या उद्भवू नये यासाठी, शहरातील जलशुद्धीकरण केंद्र, जलकुंभ येथे स्काडा प्रणाली बसवण्याचे काम प्रगतिप्रथावर आहे. या अनुषंगाने पंचवटी जलशुद्धकरण केंद्र, गंगापूर धरण पंपिंग स्टेशन, बस्टेशनमधील विविध प्रतिबंधात्मक देखभालीची कामे हाती घेण्यात आली आहेत. नागरिकांनी काटकसरीने पाण्याचा वापर करून मनपास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.