रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! कर्जत-लोणावळा नवा रेल्वे मार्ग लवकरच सुरु होणार, कशी असणार नवी मार्गिका?

नवीन रेल्वे मार्गिकेमुळं विकासाला चालना मिळणार असून, अर्थव्यवस्थेला गती मिळणार असल्याचा रेल्वेला विश्वास...

मुंबई – जर तुम्ही रेल्वेने प्रवास करत असाल तर ही बातमी नक्की वाचा… कारण ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आणि दिलासादायक आहे. कारण आता मुंबई-पुणे प्रवास आणखी जलदगतीने करता येणार आहे. रेल्वेकडून रेल्वे प्रवासासाठी अधिकाधिक रेल्वेचा प्रवास कसा सुखकर होईल, याकडे रेल्वेचा भर असतो. यासाठी अनेक नवीन मार्गिका निर्माण केला जाताहेत तर अधिक गाड्या सोडल्या जात आहेत. दरम्यान आता कर्जत-लोणावळा दरम्यान नवा रेल्वे मार्ग लवकरच होणार आ.हे यामुळे रेल्वे प्रवाशांचा रेल्वे प्रवासांचा प्रवास अधिक जलदगतीने होण्यास मदत होणार आहे.

मंजुरीनंतर प्रत्यक्ष कमाला सुरुवात…

दरम्यान, कर्जत-लोणावळा नवीन रेल्वे मार्ग लवकरच सुरुवात होणार आहे. या प्रकल्पाचा प्रस्ताव केंद्रीय रेल्वे बोर्डाला सादर करण्यात आला आहे. मंजुरी मिळाल्यानंतर प्रत्यक्ष या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती  मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्निल निला यांनी दिली आहे. दुसरीकडे उत्तर पूर्व भागात म्हणजे कसारा-इगतपुरी आणि मध्य रेल्वेच्या दक्षिण पूर्व भागात कर्जत-लोणावळा या दोन्ही ठिकाणी घाटमार्गावर प्रत्येकी दोन नवीन ट्रॅक उभारण्यात येणार आहेत. त्यापैकी कर्जत-लोणावळा भागातील मार्गिकेसाठी दोन प्रस्ताव तयार करण्यात आले आहेत. तसेच या ठिकाणी नवीन स्थानकेही उभारण्यात येणार असून, त्या भागातील अर्थव्यवस्थेला गती मिळणार आहे. या नवीन दोन मार्गिकेमुळे रेल्वे प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर आणि जलदगतीने होईल. असा विश्वास रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्ते केला आहे.

कसा आहे कर्जत-तळेगाव नवा रेल्वे मार्ग?

  1. लांबी – 60 किलोमीटर
  2. एकूण बोगदे – चार
  3. स्थानके – 6
  4. एकूण पूल – 24
कसा आहे कर्जत खोरावडे नवा रेल्वे मार्ग?
  1. लांबी – 61 किलोमीटर
  2. एकूण बोगदे – चार
  3. एकूण पूल – 20
  4. एकूण स्थानके – 6

दरम्यान, दोन्ही मार्गासाठी स्वतंत्र बोगदे आहेत. या कामासाठी वेगवेगळे दोन प्रस्ताव तयार करण्यात आले असून. केंद्रीय रेल्वे बोर्डाला पाठवले आहेत. त्यांच्या मंजुरीनंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्निल लीला यांनी दिली आहे.


About Author

Astha Sutar

Other Latest News