“आमच्यातले वाद, भांडण छोटी”, “माझ्याकडून भांडणं नव्हतीच, मिटवून टाकली चला”, राज-उद्धव यांच्या वक्तव्यानंतर दोन ठाकरे बंधू एकत्र येणार?

आमच्यातील भांडण आणि वाद ही छोटी गोष्ट आहे. क्षुल्लक गोष्ट आहे... त्यापेक्षा महाराष्ट्र खूप मोठा आहे. मराठी माणूस मोठा आहे... आणि महाराष्ट्र अस्तित्वासाठी वाद, भांडण या सर्व गोष्टी खूप शिल्लक आहेत.

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे आणि पवार ही दोन नाव घेतल्याशिवाय महाराष्ट्राचा राजकारण पूर्ण होत नाही, असं म्हटलं तरी ते वावगं ठरणार नाही. राज ठाकरे यांनी 2005 साली मूळ शिवसेनेतून बाहेर पडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. यानंतर त्यांनी अनेक निवडणुका स्वतंत्रपणे लढवल्या. परंतु राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन बंधू एकत्र आले तर महाराष्ट्र काबीज करतील. अशी लोकांची भावना आहे, या दोन बंधूंनी एकत्र यावे यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. हे दोन बंधू एकत्र यावे यासाठी वरळीत एका कार्यकर्त्याने मोठमोठे बॅनर लावले होते. परंतु दोन्ही भावांमध्ये अनेक कारणावरून मतभेद असल्यामुळे हे कधी येऊ शकले नाहीत. परंतु आत्ता पुन्हा एकदा राज ठाकरे यांच्याकडून टाळी समोर आली आहे, तसेच त्यांच्याकडून युतीचे संकेत आल्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन बंधू एकदा एकत्र येणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

विषय माझ्या एकट्याचा नाही…

दरम्यान, अभिनेते महेश मांजरेकर यांनी एका यूट्यूब चैनलसाठी राज ठाकरे यांची मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी थेट राज ठाकरेंना प्रश्न विचारला की, राज-उद्धव अजूनही एकत्र येऊ शकतात का? त्यावर राज ठाकरे म्हणाले की, आमच्यातील भांडण आणि वाद ही छोटी गोष्ट आहे. क्षुल्लक गोष्ट आहे… त्यापेक्षा महाराष्ट्र खूप मोठा आहे. मराठी माणूस मोठा आहे… आणि महाराष्ट्र अस्तित्वासाठी वाद, भांडण या सर्व गोष्टी खूप शिल्लक आहेत. एकत्र येणं आणि एकत्र राहणं ही काही फार मोठी कठीण गोष्ट आहे, असे मला वाटत नाही. परंतु विषय फक्त इच्छेचा असून, माझ्या एकट्याचा इच्छेचा आणि स्वार्थाचा नाही, असं राज ठाकरे म्हणाले.

माझ्याकडून कधीच भांडण नव्हती…

दुसरीकडे राज ठाकरे यांनी युतीचे संकेत दिल्यानंतर आणि युतीसाठी एक हात पुढे केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनीही युतीचे संकेत दिल्याचे त्यांच्या भाषणातून जाणवले. भारतीय कामगार सेनेचा 57 वी वार्षिक सर्वसाधारण सभेत उद्धव ठाकरे मार्गदर्शन करताना ठाकरेंनी केंद्र आणि राज्य सरकारवर घणाघाती हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी राज ठाकरेंच्या वक्तव्यावर बोलताना म्हणाले की, ‘माझ्याकडून भांडण कधी नव्हतीच…, पण चला आता मिटवून टाकू…’ असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. त्यामुळं राज ठाकरे यांनी दिलेल्या संकेत याला एका अर्थाने पाठिंबाच दिला आहे. त्यामुळे आगामी काळात राज ठाकरे-उद्धव ठाकरे यांची युती होणार का? पुन्हा एकदा महाराष्ट्र राजकीय भूकंप होणार का? आणि आगामी पालिका निवडणुकीसाठी राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र निवडणूक लढवणार का? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलं आहे.


About Author

Astha Sutar

Other Latest News