पुणे : तनिषा भिसे यांच्या मृत्यू प्रकरणी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला दोषी ठरवण्यात आले आहे. सोमवारी आरोग्य विभागाने नेमलेल्या समितीचा अहवाल समोर आला. त्यामुळे मंगेशकर रुग्णालयाच्या अडचण वाढल्या आहेत. आज (मंगळवार) देखील रुग्णालयाच्या अडचणी काय संपत नसल्याचे चित्र होते.
कसबा मतदारासंघाचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी मंगेशकर रुग्णालयावर आज गंभीर आरोप केला. रुग्णाच्या आणि त्यांच्य नातेवाईकाच्या कपड्यावरू त्यांना रुग्णालाय सोडायचे की नाही हे ठरत होते. गळ्यात चैन असणाऱ्यांना रुग्णालयात सोडण्यामध्ये प्राधान्य दिले जात असल्याचे धंगेकर म्हणाले.

मुंबईत बैठक
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या संदर्भात आज आरोग्य विभागाच्या सचिवांनी आज मुंबईत बैठक बोलावली होती. या बैठकीला आरोग्य विभागाकडून मंगेशकर रुग्णालयाच्या चौकशीसाठी नेमलेले सर्व सदस्य उपस्थित राहिले. समितीने दिलेल्या अहवालामध्ये रुग्णालयाला दोषी ठरवण्यात आले आहे. त्यामुळे या बैठकीत समितीच्या अहवालावर चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे.
पुणे महापालिकेचा दणका
रुग्णालयाने महापालिकेचा 27 कोटीचा कर थकवल्याचे समोर आले होते. मात्र, रुग्णालयाकडून हा व्यावसायिक कर असून याविरोधात न्यायालयात केस सुरू असल्याचे सांगितले होते. न्यायालयाने सांगितल्यानंतर आम्ही कर भरू असे स्पष्ट केले होते. मात्र, आज पुणे महापालिकेने मिळकतकर वसुलीसाठी नोटीस रुग्णालयाला दिली आहे. मागील दहा वर्षांपासून रुग्णालयाकडे मिळकतकराची थकबाकी आहे. तसेच दोन दिवसात कर न भरल्यास जप्तचा इशारा दिला आहे.
अहवालाची प्रतीक्षा
सोमवारी आरोग्य विभागाने नेमलेल्या समितीचा अहवाल समोर आला होता. आज धर्मादाय आयुक्त आणि माता मृत्यू प्रकरणी नेमलेल्या समितीचा अहवाल समोर येण्याची शक्यता होती. मात्र, हा अहवालाबाबात अधिकृतरित्या माहिती कळू शकली नाही. मात्र, या दोनही समित्यांनी आपला अहवाल वरिष्ठांना दिल्याची माहिती आहे.
खिलारे यांची टीका
भाऊसाहेब खिलारे यांनी दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाला आपली सहा एकर जागा दान केली होती. त्या भाऊसाहेब खिलारे यांचे वारस चित्रसेन खिलारे यांनी रुग्णालयावर टीका केली आहे. रुग्णालयाला माणुसकी राहिली नाही का? तनिषाबाईला आपण परत आणू शकणार आहोत का?तिची दोन मुलं उद्या रुग्णालयाच्या दारात उभे राहिले तर रुग्णालय त्यांची परत आई परत आणून देणार आहेत का?