पवार कुटुंबीय आले एकत्र!  अजित पवारांचा पुत्राचा साखपुडा ठरले निमित्त, शरद पवारांनीही दिले आशीर्वाद

साखपुड्याच्या समारंभासाठी सुनेत्रा पवार यांनी आपल्याला फोन केला होता, अशी माहिती सुप्रिया सुळे यांनी दिली होती. या समारंभासाठी आपण, आपले पती सदानंद सुळे तसेच कन्या रेवती उपस्थित राहणार असल्याचे सुप्रिया सुळे यांनी आधीच जाहीर केले होते. 

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर कौटुंबीक कार्यक्रमा निमित्त पवार कुटुंबीय पहिल्यांदाच एकत्र आल्याचे दिसले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव जय पवार यांचा साखरपुडा यासाठी निमित्त ठरला. या समारंभाला शरद पवार, प्रतिभा पवार,  सुप्रिया सुळे यांच्यासह पवार कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.

पुण्याजवळील घोटावडे येथे असलेल्या अजित पवार यांच्या फार्महाऊसवर हा समारंभ मोजक्याच मंडळीच्या उपस्थितीमध्ये पार पडला. या सोहळ्यासाठी आकर्षक विद्युत रोषणाई आणि भव्य आरास फार्महाऊसला करण्यात आली होती. 

2023 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी झाली होती. त्यानंतर अजित पवार-शरद पवार यांच्यामध्ये सर्वकाही ठीक नसल्याचे चित्र होते. लोकसभा निवडणुकीत अजित पवारांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेमुळे दोन्ही पवारांमध्ये अधिक कटुता वाढली होती. मात्र, पवार कुटुंबीय साखरपुड्याच्या निमित्ताने एकाच मांडवाखाली आल्याने ही कटुता कमी झाल्याचे बोलले जात आहे.

जय-ऋतुजाचा साखपुडा

जय पवार यांचा साखपुडा व्यावसायिक प्रवीण पाटील यांच्या कन्या ऋतुजा पाटील यांच्यासोबत झाला. पाटील कुटुंबीय हे मुळचे फलटणमधील आहेत. ऋतुजा या फलटण येथील सहकार महर्षी हणमंतराव पवार यांची नात आहेत.हणमंतराव पवार यांची कन्या पल्लवी पाटील यांची कन्या आहे.  ऋतुजा पाटील या फलटणमधील एका माॅलच्या संचालिका आहेत. 

सुनेत्रा पवारांचा सुप्रिया सुळेंना फोन…

साखपुड्याच्या समारंभासाठी सुनेत्रा पवार यांनी आपल्याला फोन केला होता, अशी माहिती सुप्रिया सुळे यांनी दिली होती. या समारंभासाठी आपण, आपले पती सदानंद सुळे तसेच कन्या रेवती उपस्थित राहणार असल्याचे सुप्रिया सुळे यांनी आधीच जाहीर केले होते.

 


About Author

Arundhati Gadale

Other Latest News