लाडकी बहिण योजनेचा जून महिन्याचा हप्ता कधी मिळणार? 12 व्या हप्त्याबाबत मोठी अपडेट आली समोर

लाडकी बहिण योजनेच्या हप्त्यांमध्ये होणारी दिरंगाई महिलांच्या चिंतेचा विषय बनलेला आहे. अशा परिस्थितीत आता जून महिन्याचे पैसे कधी मिळणार, असा सवाल आता लाडक्या बहिणी विचारताना दिसत आहेत.

लाडकी बहीण योनजेच्या जून महिन्याच्या हप्तासंदर्भात आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, लाडकी बहीण योजनेचा हप्ता सधारणत: प्रत्येक महिन्याच्या 15 ते 20 तारखेच्या नंतर बँकेत जमा करण्यात येत असतो. अशाच प्रकारे आता जून महिन्याचा हप्ता सुद्धा 20 तारखेच्या आसपास मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, या संदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये किंवा तशी घोषणाही करण्यात आलेली नाहीये.

जून महिन्याच्या पैशांची प्रतीक्षा

लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता जून महिन्याच्या सुरुवातीला मिळाला. आता जून महिन्याचा हप्ता नेमका कधी मिळणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. लाडक्या बहिणींना देण्यात येणाऱ्या या हप्त्याला गेल्या काही दिवसांपासून उशीर होताना दिसत आहे. एप्रिल महिन्याचा हप्ता मे महिन्याच्या सुरुवातीला तर मे महिन्याचा हप्ता जून महिन्याच्या सुरुवातीला देण्यात आला. त्यामुळे आता जून महिन्याचा हप्ता नेमका कधी मिळणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

अनेक महिला ठरणार अपात्र

प्राप्तिकर विभागाच्या अखत्यारित असलेल्या केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने योजनेतील लाभार्थी महिलांची आपल्याकडील माहिती उपलब्ध करुन देण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांच्या व्यापक छाननीचा मार्ग मोकळा झाला आहे. इन्कम टॅक्स विभागाकडून सर्व डेटा दिला जाणार आहे. या डेटाच्या आधारावर 2.5 लाखांहून अधिक उत्पन्न असलेल्या महिलांची यादी तयार करण्यात येणार आहे. या महिलांना मिळणारा लाभ बंद केला जाणार आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योनजेच्या अंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये देण्यात येतात. लाभार्थी महिलांच्या थेट बँक खात्यात हे पैसे जमा करण्यात येत असतात. महायुती सरकारने सुरू केलीली ही योजना खूपच लोकप्रिय ठरली. इतकेच नाही तर ही योजना विधानसभा निवडणूक 2024 मध्ये गेमचेंजर ठरली आणि महायुतीचा महाविजय झाल्याचं बोललं जात आहे.


About Author

Rohit Shinde

Other Latest News