Devendra Fadnavis : ७ जून रोजी मुस्लिम बांधवांचा ईद सण आहे. यासाठी मुस्लिम बांधवांकडून सणांची जय्यत तयारी सुरु आहे. दरम्यान, आगामी ईद सणानिमित्त मुंबईबरोबरच राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला. तसेच या सणानिमित्त घ्यावयाची काळजी आणि खबरदारी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूचना दिल्या.
सण-उत्सवात कायदा सुव्यवस्था उत्तम राहवी…
दरम्यान, महाराष्ट्रात सण-उत्सव काळात कायदा सुव्यवस्था नेहमीच उत्तम राखली जाते. पोलीस देखील अहोरात्र मेहनत घेऊन कुठेही सणांच्या दिवशी गालबोट लागणार नाही, याची काळजी घेतला. त्याचप्रमाणे आगामी ईदसाठी देखील शासनाने योग्य नियोजन केले असून या काळात कायदा व सुव्यवस्था चोख राखत सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले.

देवनार पशुवधगृहाचा प्रश्न…
दुसरीकडे मुंबईतील देवनार येथील पशुवधगृहाचा प्रश्नाबाबत खासदार वर्षा गायकवाड यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. तसेच या ठिकाणी बकऱ्यांच्या कुर्बानीबाबत सत्ताधारी विरोधक यांच्यात कलगीतुरा सुरु आहे. याबाबत खासदार वर्षा गायकवाड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत, या प्रश्नाबाबत लक्ष घालण्याचे विनंती केली होती. दरम्यान, आगामी ईदच्या पार्श्वभूमीवर राज्यात कायदा व सुव्यवस्था चोख राखण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा, आमदार सर्वश्री अस्लम शेख, अबू आझमी, अमीन पटेल, रईस शेख, श्रीमती सना मलिक आदी उपस्थित होते.