मुंबई – आदिवासी विकास विभागाच्या विविध समस्या जाणून घेण्यासाठी आदिवासी मंत्री डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते विविध नाविन्यपूर्ण डिजिटल इ पोर्टलचे उद्घाटन करण्यात आले. आदिवासी विकासाच्या विभागाच्या विविध नाविन्यपूर्ण पोर्टलमुळे आदिवासी समाज सार्वजनिक प्रगतीसाठी घेतलेला हा डिजिटल पुढाकार भविष्यात सर्वसामावेशक विकासाच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वपूर्ण ठरेल. असा विश्वास आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी व्यक्त केला.
विविध पोर्टलचे उद्घाटन…
दरम्यान तक्रार निवारण पोर्टल, सन्मान पोर्टल ऑल आऊट सुविधा, निरीक्षक टास्क मॅनेजर सॉफ्टवेअर, शर्वरी नॅचरल कॉमर्स पोर्टल आदी नाविन्यपूर्ण पोर्टलचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी आदिवासी आयुक्तालय वार्षिक आराखडा आणि आर्थिक नियोजन संकलन पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. आदिवासी समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक विकासाला गती देण्यासाठी हा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. तसेच आदिवासीच्या विकासासाठी दृढ संकल्प केला पाहिजे. असे डॉ. अशोक उईके यांनी सांगितले.

विविध पोर्टल विषयी थोडक्यात माहिती…
अबीईएएस पोर्टल – आधार च्या माध्यमातून सर्व कर्मचारी अधिकारी यांची दैनंदिन हजेरी फेस आयडी नुसार घेतली जाणार आहे.
ई- निरीक्षक ऍप्लिकेशन – शाळांची मॉनिटरिंग करून त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी वापरण्यात येणारी प्रणाली.
कॉल आउट सुविधा – लाभार्थ्यांना लाभ मिळाला की नाही, त्यांना काय अडचणी आल्या याबाबत आता कॉल आउट सुविधा सुरू करण्यात आली आहे.
सन्मान पोर्टल – सहकार्य, न्याय, मार्गदर्शन आणि निवारण असे हे पोर्टल आदिवासी विभागातील कर्मचाऱ्यांच्या तक्रार निवारण प्रणाली आहे.
टास्क मॅनेजर – अधिकारी कर्मचारी यांची नियमित दैनंदिन कामे ऑनलाईन पोर्टल वर नियंत्रित करणे.
शबरी नॅचरल्स इ कॉमर्स पोर्टल – आदिवासी बांधवांची प्रीमियम उत्पादने ऑनलाईन स्वरूपात उपलब्ध होणार आहे.
न्यूकलियस बजेट – आदिवासी बांधवांना प्रकल्प अधिकारी स्तरावरून अनुदान देण्यासाठी पोर्टल