कमॉन किल मी! समोरुन वार करा… ठाकरे ब्रॅन्ड संपणार नाही, उद्धव ठाकरेंचं भाजपा-शिंदे गटाला आव्हान

आज आपल्यात भांडण लावली जात आहेत. हिंदी सक्ती कशाला हवी आहे, आम्ही हे करू देणार नाही. भाजपाला जोड्याने हाणले पाहिजे. भाजपची भ्रष्ट लोंक माता-भागणींना सिंदूर वाटत आहेत. असा हल्लाबोल उद्धव ठाकरे भाजपावर केला.

Uddhav Thackeray – गुरुवारी शिवसेनेचा ५९ वा वर्धापन दिन होता. यावेळी एकनाथ शिंदेंची सेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाकडून दोन्ही शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. बाळासाहेबांनी रक्त आठवून हा विचार पेरला आहे. हा जल्लोष व वातावरण पाहून मी भारावून गेलो आहे. आज जे दाढी फुटली तेव्हा ते कुठे होते माहित नाही. अशी टोला उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेने लगावला. मी तुम्हाला जाहीरपणे आव्हान देतो. समोर येऊन वार करा. तुमच्या छाताडावर बसेन, पण ठाकरे ब्रॅन्ड संपणार नाही, असा इशारा उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांना दिला.

कमॉन किल मी…

दरम्यान, ही मुंबई तुम्ही आता हातातून घालू देणार आहात का? असा प्रश्न शिवसैनिकांना उद्धव ठाकरे विचारला. राज्यात, देशात अनेक प्रश्न आहेत. मुंबईत हिंदी भाषेवरून आणि हिंदू मुस्लिमवरून भांडण लावली जात आहेत. हे बाळासाहेब ठाकरेंनी आणि मराठी माणसाने रक्ताचे पाणी करून मुंबई वाचविले आहे. एका सिनेमात नाना पाटेकर गुंडांसमोर उभे राहून त्यांना म्हणतो की, कमॉन किल मी… तसं मी आज या सत्ताधाऱ्यांना आव्हान देतो की, कमॉन किल मी…. समोर येऊन लढा, समोरून वार करा, पण महाराष्ट्रात महाराष्ट्रातून ठाकरे नावाचा ब्रँड तुम्ही संपवू शकत नाही. असं उघडपणे आव्हान उद्धव ठाकरेंनी भाजपा आणि शिंदे गटाला दिले.

जे राज्याच्या मनात तेच होईल…

सध्या राज ठाकरें, उद्धव ठाकरे एकत्र येणार का? यावरून राजकीय वर्तुळात चर्चा रंगत आहे. यावर उद्धव ठाकरेंनी सूचत वक्तव्य केले आहे. व युतीबाबत आपण सकारात्मक असल्याचे त्य़ांनी आपल्या बोलण्यातून दाखवले. सर्वांना वाटतंय त्याचे काय? जे मराठी माणसाच्या भल्यासाठी… महाराष्ट्रासाठी आम्ही एक पाऊल पुढे येऊ शकतो. आज जे शिवसैनिकांच्या मनात आहे…, आणि राज्याच्या मनात आहे तेच होईल, असे मनसे युतीवर उद्धव ठाकरेंनी सकारात्मक संकेत दिले आहेत.

देशाला घरफोड्या गृहमंत्री नको…

आज देशाला पंतप्रधान यांची गरज आहे, पंतप्रधान भाजपाचा आहे. देशाला गृहमंत्री हवा आहे, घरफोडी अमित शहा नको आहे. आमची इंडियन मुजाईल सोबत तुलना करताना मोदींना लाज वाटली नाही, मग आमचेच खासदार जगभरात तुम्ही न केलेले शौर्य सांगण्यासाठी पाठवले. अशी टीका उद्धव ठाकरेंनी मोदी शाहवर केली. भाजपाला पोर होत नाहीत म्हणून ते दुसऱ्याची पोर आणी बाप चोरतात. भाजपने पळवलेले काही लोंक आपल्यावर टिका करत आहेत. या चोरांना काही लाज लज्जा नाही. नॅपकिन पण ठेवला नाही. सरकारने जे वाद केले होते ते फसवे होते.

जोड्याने हाणले पाहिजे…

सगळे घोटाळा करणारे सरकार आहे. भाजप किती पिढा सतरंजा उचलन्याता घालणार माहित नाही. तुमच्यावर उपरे येऊन बसतात. हिंदू मुस्लमानवर बोलणारा एकजण बसवला आहे. तुमची उंची केवडी बोलता किती? असं म्हणत उद्धव ठाकरेंनी नितेश राणे यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. भाजपने फक्त दाऊदाला तेवढे घेणे बाकी आहे. ७० हजार कोटी घोटाळा केला त्यांचेच पाय धुऊन पाणी भाजपा पित आहे. अशी टिका ठाकरेंनी भाजपावर केली.


About Author

Astha Sutar

Other Latest News