मुंबई – सध्या उन्हाळा सुरू आहे आणि कडाक्याचं ऊन आणि वातावरणातील तापमानाचा पारा कमालीचा वाढला आहे. पावसाला अजून दोन महिन्याचा अवधी आहे, तरीसुद्धा आता पाण्याचा तुटवडा जाणवत आहे. मात्र आता पावसाबाबत एक महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येत आहे. या आठवड्यात विदर्भातील काही भागात म्हणजे गडचिरोली, नागपूर, अमरावती, वर्धा, वाशिम, गोंदिया आणि यवतमाळ या भागात मेघगर्जनासह आणि विजेचा कडकडाट यासह पावसाची शक्यता असल्याचं हवामान खात्याने म्हटले आहे.
ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगाने वारी
दरम्यान, काही जिल्ह्यांना अलर्ट देण्यात आला आहे. सध्या महाराष्ट्रात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. तसेट विदर्भातील काही भागात वादळी वाऱ्यासह आणि विजेच्या कडकडाटसह पावसाची शक्यता आहे आणि ताशी 50 ते 60 किलो मीटर वेगाने वादळी वाहने वारे वाहण्याची शक्यता असल्याचे हवामान खात्याने म्हटले.

१-२ अंश सेल्सिअस तापमानात घट
दुसरीकडे सध्या मागील काही दिवसांपासून कमालीचा उखाडा जाणवत होता. मात्र एक-दोन दिवसात महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील काही भागात कमाल तापमानात एक ते दोन अंश सेल्सिअसनी घट झाले आहे. महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर तर दुसरीकडे नाशिक, विदर्भातील नागपूर, गोंदिया, यवतमाळ भागातील तापमानाच्या पाऱ्यात घट झाली आहे. तर या आठवड्यात हवामान दमट आणि उष्ण राहण्याची शक्यता असून, पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.