मुंबई – बुधवारी पहलगाम येथे दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात निष्पाप २६ पर्यटकांना जीव गमवावा लागला. यात महाराष्ट्रातील ६ पर्यटकांचा समावेश आहे. दरम्यान, डोंबिवलीतील तीन पर्यटकांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. डोंबिवलीतील जय लेले, हेमंत जोशी आणि अतुल मोने यांचे पार्थिव काल रात्री डोंबिवलीत दाखल झाले. यानंतर रात्री त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी पार्थिवांचे अंत्यदर्शन घेतले. सध्या डोबिंवलीत शोकाकूल वातावरण आहे. त्यामुळं आज हल्ल्याच्य निषेधार्थ आज डोबिंवलीत बंद पाळण्यात येणार आहे.
आज डोबिंवली बंद…
दरम्यान, आज दहशतवाद्यांच्या क्रूर कृत्याचा निषेध करण्यासाठी सर्व पक्षीयांनी गुरुवारी डोंबिवली बंदची हाक दिली आहे. या बंदमध्ये शहरातील सर्व नागरिक, व्यावसायिक, व्यापारी सहभागी होण्याचे आवाहन सर्व पक्षीयांनी आवाहन केले आहे. तर दुसरीकडे या हल्ल्यानंतर देशभरात पाकिस्तानविरोधात मोठा संताप व्यक्त करण्यात येत असून, दहशवाद आणि पाकिस्ताविरोधात संतापाची लाट आहे. मोर्चे आणि आंदोलन काढण्यात येत आहेत. तर डोबिंवलीसह राज्यात ठिकठिकाणी आज बंद पाळण्यात येणार आहे. डोबिंवलीसह परभणी आणि मालेगावमध्येही आज बंद पाळण्यात येत आहे.

डोबिंवलीत घोषणाबाजीने परिसर दुमदुमला…
बुधवारी रात्री डोबिंवलीत जय लेले, हेमंत जोशी आणि अतुल मोने यांचे पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी कुटुंबीयांचे सांत्वन मुख्यमंत्र्यांनी केले. यावेळी नागरिकांनी मोठमोठ्या घोषणाबाजी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व्यासपीठाजवळ उभे असतानाच मैदानातील संतप्त नागरिकांनी पाकिस्तान मुर्दाबाद…, भारत माता की जय…, जय श्रीरामच्या घोषणा दिल्या. दहशवाद्यांना कोणालाही सोडू नका. आपण कठोर कारवाई करा, असे उद्विग्न भावना लोकांची होती. दहशतवाद्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी सरकार कटिबध्द असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.