हल्ल्यानंतर अनेक पर्यटकांचा काश्मीरला जाण्याचा प्लॅन कॅन्सल, टुरिस्ट कंपन्यांचेही बुकिंग रद्द…

सुट्टीमध्ये ज्यांनी काश्मीरमध्ये जाण्यासाठी प्लॅन केला होता. त्यांच्याकडून काश्मीरला जाण्याचा प्लॅन रद्द करण्यात येत असून, अन्य ठिकाणाला पर्यटक पसंती देताहेत.

मुंबई – काश्मीरमधील पहेलगाम येथे मंगळवारी दहशतवादांनी भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला. तर यामध्ये महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचा समावेश आहे. या हल्ल्यानंतर जे पर्यटक कश्मीरमध्ये अडकलेत त्यांना परत आणण्याची व्यवस्था सुरु असताना, आता सुट्टीमध्ये ज्यांनी काश्मीरमध्ये जाण्यासाठी प्लॅन केला होता. त्यांच्याकडून काश्मीरला जाण्याचा प्लॅन रद्द करण्यात येत असून, अन्य ठिकाणाला पर्यटक पसंती देताहेत. तर टुरिस्ट कंपन्यांचेही बुकिंग रद्द करण्यात येत असल्याची माहिती समोर येत आहे.

टुरिस्ट कंपन्यांचेही बुकिंग रद्द…

दरम्यान, काश्मीमधील हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये भीतीचे आणि तणावाचे वातावरण आहे. या सर्वांचा परिणाम पर्यटनावर होण्याची शक्यता आहे. दरम्यान, हल्ल्यानंतर अनेक पर्यटकांनी काश्मीरला जाण्याचा प्लॅन कॅन्सल केला आहे. काश्मीरऐवजी अन्य ठिकाणी जाण्याचा बेत पर्यटक आखत आहेत. तर जे टुरिस्ट कंपन्यांचे केले आहे, ते टुरिस्ट कंपन्यांचेही बुकिंग रद्द करण्याची वेळ आली आहे. त्यामुळं काश्मीर मधील पर्यटन व्यवसायासह टुरिस्ट कंपन्यांनाही याचा मोठा फटका बसणार आहे. एप्रिल-मे महिन्यात शाळा-कॉलेजच्या परीक्षा संपल्यानंतर महाराष्ट्रातील अनेकजण फिरण्यासाठी म्हणून काश्मीरची निवड करतात. पण आता काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यानंतर पर्यटकांनी जो प्लॅन केला होता. तो प्लॅन रद्द करावा लागला आहे.

पर्यटन क्षेत्रावर परिणाम होण्याची शक्यता…

दरम्यान, काश्मीरमध्ये देशासह जगभरातील पर्यटक सहलीचा आनंद घेण्यासाठी जातात. काश्मीरमध्ये उत्पन्नाचे मुख्य स्त्रोत म्हणून पर्यटनाकडे पाहिले जाते. इथे कोणतेही उत्पन्नाचे अन्न साधन नसल्यामुळे पर्यटन हा मुख्य उत्पन्नाचा स्त्रोत आहे. काश्मीर हा पृथ्वीवरील स्वर्ग समजला जाता आणि देशातील मिनी स्विंझलँड म्हणून काश्मीरकडे पाहिले जाते. पर्यटकांसाठी काश्मीर हे नंदनवन मानले जाते. दरवर्षी २ ते ३ करोड व्यवसाय टुरिझममधून होतो. परंतु या हल्ल्यानंतर याचा परिणाम पर्यटन क्षेत्रावर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेवरती परिणाम दिसून येणार असल्याचे बोलले जात आहे.


About Author

Astha Sutar

Other Latest News