कुरळे केस सरळ करण्यासाठी ‘हे’ हेअर मास्क फायदेशीर जाणून घ्या…

कुरळ्या केसांमुळे त्रस्त आहात? सरळ आणि मऊ केसांसाठी लावा 'हे' हेअर मास्क

आजकाल केस गळण्याची समस्या खूप सामान्य झाली आहे. यासाठी महिला विविध घरगुती उपायांचा अवलंब करतात. बाजारात उपलब्ध असलेल्या उत्पादनांचा वापर करतात. असे असूनही. कोणताही महत्त्वपूर्ण परिणाम दिसून येत नाही. आपल्यापैकी बरेच लोक कुरळ्या केसांमुळे त्रस्त आहेत. कुरळे केस सरळ करण्यासाठी ब्युटी पार्लरमध्ये जातात. यासाठी त्यांना जास्त पैसे खर्च करावे लागतात. तथापि, नंतर त्यांना त्याचे दुष्परिणाम देखील दिसतात. आज आम्ही तुम्हाला काही खास टिप्स सांगणार आहोत. ज्यामुळे तुमचे केस सरळ होण्यास मदत होईल.

दही आणि केळीचा हेअर मास्क

कुरळे केस सरळ आणि मऊ करण्यासाठी, तुम्ही केळी आणि दह्याचा हेअर मास्क लावावा. यामुळे केसांना पोषण मिळेल. तसेच चमक वाढेल. हे कोरडेपणा दूर करते आणि केसांना मुळांपासून ताकद देते. 1/2 कप दही आणि 1 केळी मिक्स करा. हे मिश्रण केसांना आणि टाळूला लावून 30 मिनिटे ठेवा. नंतर केस पाण्याने धुवून स्वच्छ करा. काही दिवसांतच तुम्हाला फरक दिसायला लागेल.

कोरफड आणि ऑलिव्ह ऑईल 

तुमचे कुरळे केस मऊ करण्यासाठी तुम्ही कोरफड आणि ऑलिव्ह ऑइल असलेला मास्क केसांना लावू शकता. यामुळे केस चमकदार होतील. केस धुण्यापूर्वी सुमारे ३० मिनिटे आधी हा मास्क लावा. नंतर केस पाण्याने धुवून स्वच्छ करा.काही आठवड्यांत तुम्हाला त्याचे परिणाम दिसू लागतील. 

अंडी आणि दह्याचा हेअर मास्क

तुम्ही तुमच्या केसांना अंडी आणि दह्याचा हेअर मास्क देखील लावू शकता, जो केसांच्या वाढीसाठी खूप फायदेशीर मानला जातो. ते केसांच्या मुळांपर्यंत पोहोचते आणि त्यांना पोषण देते, ज्यामुळे केसांची चमक वाढते. तसेच, कुरळे केस खूप मऊ होतात. आठवड्यातून ३ ते ४ वेळा हा हेअर मास्क वापरता येतो.

मध आणि दुधाचा हेअर मास्क

मध आणि दुधाचा हेअर मास्क देखील केसांसाठी रामबाण उपाय मानला जातो. याचा वापर केल्याने तुम्हाला एका आठवड्यात फरक दिसेल. यामुळे केसांमध्ये चमक येते. तसेच केस लांब आणि मऊ होतात. 1 चमचा मध आणि 1 कप दुध एकत्र करा. हे मिश्रण केसांना आणि टाळूला लावून 30 मिनिटे ठेवा. नंतर, केस पाण्याने धुवून स्वच्छ करा.

(टीप : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News