डोळ्यांची दृष्टी वाढवण्यासाठी ‘हे’ पदार्थ आहेत अतिशय फायदेशीर

डोळ्यांची काळजी कशी घ्यावी 'हे' पदार्थ तुमच्या आहारात समाविष्ट करा.

आजकाल वेगवेगळ्या कारणांनी कमी वयातच लोकांचे डोळे कमजोर किंवा दृष्टी कमजोर होताना दिसत आहे. कमी वयातच चष्मा लावण्याची वेळ येत आहे. याला वेगवेगळ्या गोष्टी कारणीभूत आहेत. फोन, कम्प्युटर, टीव्ही यांचा वापर अधिक वाढला आहे. तसेच खाण्या-पिण्यातही पौष्टिक नसल्याने डोळ्यांनाही योग्य ते पोषण मिळत नाही. अशात डोळ्यांची दृष्टी चांगली ठेवण्यासाठी काय केलं पाहिजे हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. आपण जे खातो त्याचा परिणाम आरोग्यावर होतो. आपण जे खाणार त्याचा परिणाम नक्कीच आपल्या दृष्टीवर देखील होणार. चला तर बघूया चांगल्या दृष्टीसाठी कोणत्या पदार्थांचा आहारात समावेश केला पाहिजे.

पपई

पपईमध्ये व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई भरपूर प्रमाणात असतं. पपई आपल्या डोळ्यांसाठी खूप फायदेशीर असते. पपईचं नियमितपणे सेवन केल्याने डोळ्यांना नुकसानकारक किरणांपासून वाचवलं जातं. पपई तुम्ही नाश्त्यात खाऊ शकता. डोळ्यांची जळजळ आणि सूज पपईने दूर होते.

आंबट फळे

डोळ्यांची दृष्टी वाढवण्यासाठी लिंबूवर्गीय फळांचे सेवन फायदेशीर ठरते. त्यामध्ये Vitamin C भरपूर प्रमाणात असते. याशिवाय यामध्ये Vitamin E आणि खास अँटीऑक्सिडंट्स असतात. ते डोळ्यांचा कोरडेपणा दूर करण्यास मदत करतात. याची पूर्तता करण्यासाठी लिंबू आणि संत्री यांसारख्या फळांचा आहारात समावेश करावा.

गाजर

गाजर आपल्या डोळ्यांचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी मदत करतात. गाजरामध्ये व्हिटॅमिन ए आणि बीटा कॅरोटीन भरपूर प्रमाणात असतं. या दोन्ही तत्वांमुळे डोळ्यांची दृष्टी वाढते. यानी डोळ्यांच्या सेल्स वाढतात. गाजराचा ज्यूस रोज सेवन केल्यास डोळे चांगले राहतात.

पालक

पालक मध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजे मुबलक प्रमाणात असतात. पालक मोतीबिंदूपासून तुमचे रक्षण करते.

रताळे

रताळे डोळ्यांची दृष्टी वाढवण्यासाठी ओळखले जातात. जे तुमच्या डोळ्यांची जळजळ कमी करण्यास मदत करतात.

(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News