अनेकदा दिवसभर काहीही खाल्लेलं नसतानाही अजिबातचं भुक लागतं नाही, कधी कामाचे टेन्शन तर कधी कधी दररोजच्या कामकाजामध्ये व्यस्त असल्याने देखील भूक लागत नाही. त्यामुळं अचानक भूक न लागणे, जेवण न करणे, अन्नावरुन मन उडून जाणे, असं घडू लागल्यामुळं चिंता वाटू लागते. सुरुवातीला जरी हे सामान्य वाटत असलं तरी खरंतर भूक न लागणे हे काही आजारांचे संकेत असू शकतात. काही महत्त्वपूर्ण घटना झाल्यानंतर भूक आणि झोप न लागणे असं घडू शकतं. पण सातत्याने असं घडत असेल तर काळजी करण्याचे कारण आहे. कारण हे आजाराचे संकेत असू शकतात. भूक लागण्यासाठी कोणते उपाय करू शकता आणि त्याची कारणे काय आहेत ते जाणून घेऊया…
भूक न लागण्याची कारणे
कधीकधी काही मानसिक व्याधी सुद्धा यासाठी कारणीभूत असतात. अनेकदा टेन्शन, स्ट्रेस या कारणांचा सुद्धा भुकेवर परिणाम होतो. जर ऑफिसच्या कामाचा जास्त लोड जर आपल्यावर असेल त्यावेळी सुद्धा भूक अजिबात लागत नाही.

थायरॉइड
थायरॉइड ही एक ग्रंथी आहे. जी हार्मोन उत्पादन करते ज्यामुळं शरीरातील महत्त्वपूर्ण कामावर नियंत्रण येते. जेव्हा थायरॉइडचे संतुलन बिघडले तर हार्मोन्सचे उत्पादन कमी होऊ शकते. ज्यामुळं भूक न लागणे, वजन वाढणे, थकवा आणि अन्य लक्षणे असू शकतात.
मानसिक ताण
कधीकधी काही मानसिक व्याधी सुद्धा यासाठी कारणीभूत असतात. अनेकदा टेन्शन, स्ट्रेस या कारणांचा सुद्धा भुकेवर परिणाम होतो. जर ऑफिसच्या कामाचा जास्त लोड जर आपल्यावर असेल त्यावेळी सुद्धा भूक अजिबात लागत नाही.
भूक लागण्यासाठी घरगुती उपाय
भूक लागत नसेल तर, डाळींब, आवळा, वेलची, ओवा, आणि लिंबू खावे. या गोष्टी शरीराला लाभदायक असतात. त्यांनी शरीराला आवश्यक अनेक पोषक द्रव्ये मिळतात. याशिवाय एरोबिक्स व्यायामाने भूक लवकर लागते.
खूप पाणी प्या
जास्त पाणी प्यायल्याने शरीरातील घाण बाहेर निघते, पोट साफ राहते परिणामी भूक चांगली लागते. पाणी त्वचेला सुंदर करते. दिवसातून किमान 5 ते 6 लीटर पाणी प्यायला हवे.
त्रिफळा चूर्ण
त्रिफळा चूर्ण अनेक समस्यांवर रामबाण उपाय आहे. याला मुख्यतः बद्धकोष्ठता दूर करण्यास वापरलं जातं. तुम्हाला वेळेवर भूक लागत नसल्यास त्रिफळा चूर्ण वापरा. हलक्या गरम दुधात एक चमचा त्रिफळा चूर्ण टाकून घ्या. हे नियमित घेतल्याने भूक वाढते.
ग्रीन टी घ्या
ग्रीन टी भूक वाढवण्यास प्रभावी आहे. याच्या नियमित सेवनाने केवळ भूक वाढते असे नाही तर अनेक आजारांमध्ये आराम मिळतो. तुम्हाला सकाळ-संध्याकाळ चहा आवडत असल्यास इतर कुठला चहा पिण्याऐवजी ग्रीन टी घ्या.
ओवा
ओवा खाल्ल्यानं पोटाच्या अनेक समस्या दूर होतात. अपचन किंवा भूक न लागण्याच्या समस्येत ओवा खाऊ शकता. यानं पोटही साफ राहतं. याला हलकं भाजून यात मीठ टाकून खा. दिवसातून दोन वेळा खाऊ शकता.
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.)