Full Form of English Words: बहुतेक लोकांचा असा विश्वास आहे की BYE हा शब्द गुडबायचा एक छोटासा प्रकार आहे. जो सामान्यतः मित्र, सहकारी किंवा सामान्य लोकांना निरोप देताना वापरला जातो. परंतु BYE सारखा शब्द त्याच्या पूर्ण स्वरूपात इतका उबदार आणि अर्थपूर्ण असेल याची कल्पना कोणी केली असेल? जोपर्यंत कोणीतरी ते एखाद्याला विनोद म्हणून सांगत नाही तोपर्यंत हा संपूर्ण शब्द कळणे कठीण आहे . इंग्रजीतील BYE चे हे पूर्ण रूप वास्तविक जीवनातील परिस्थितीत तसेच WhatsApp सारख्या सोशल मीडिया अॅप्सवर मोठ्या प्रमाणात वापरले जाते.

BYE या शब्दाचा फुल्ल फॉर्म-
BYE या शब्दाचा फुल्ल फॉर्म सांगायचं झालं तर, ”Be With You Everytime” असा आहे. ज्याचा अर्थ आहे नेहमीच तुमच्या सोबत. या शब्दाची सुरुवात कशी झाली याचा तसा कोणताही इतिहास नाही. परंतु काही लोकांच्या म्हणण्यानुसार हा शब्द १६ शतकात इंग्रजांकडून प्रचलित झाला आहे. असेही म्हटले जाते की, हा शब्द फ्रान्सिस शब्द ‘आदियु’वरून घेतला गेला आहे. ज्याचा अर्थ देव तुमचं भलं करो असा होतो.
या शब्दाचा वापर विविध स्वरूपात केला जातो. जसे की, कोणालाही भेटल्यांनंतर, कोणालाही इमेल करताना किंवा कोणाशीही चॅटिंग करताना, हा शब्द सतत वापरला जातो. मात्र काही परिस्थितीनुसार वयस्कर लोकांसोबत बोलताना असे शब्द बोलणे टाळले पाहिजेत. मित्रांसोबत किंवा प्रोफेशनल ठिकाणी असे शब्द वापरणे आता सामान्य आहे.
शब्द लिहिण्याचे नियम-
उपलब्ध माहितीनुसार, हा शब्द इंग्रजीत लिहिताना त्याचे काही खास नियम आहेत. इंग्रजीत हा शब्द वापरताना Bye किंवा Bye-Bye असा लिहिला पाहिजे. अर्थातच बी कॅपिटल स्वरूपात लिहला पाहिजे.
या शब्दाबाबत लोकांमध्ये एकमत दिसून येत नाही. अनेक लोक अनेक उदाहरणे देत असतात. काही लोकांचे म्हणणे आहे . कोणाचाही निरोप घेताना अगदी हळुवार भावनिक शब्द आहे. मात्र काही लोकांचे म्हणणे आहे कि हा शब्द असंवेदनशील आहे. त्यामुळे या शब्दाबाबत अनेक मत दिसून येतात.