Dandruff in Hair: केसांमध्ये प्रचंड कोंडा झालाय, खाजही सुटतेय? लगेच करा ‘हे’ घरगुती उपाय

How to Get Rid of Dandruff in Hair: केसांमध्ये प्रचंड कोंडा झालाय? ट्राय करा 'हे' घरगुती उपाय, दिसेल फरक

 Home Remedies to Get Rid of Dandruff in Hair:  आपल्याला माहितेय की, केसांची योग्य काळजी न घेतल्याने केस गळू शकतात. पण त्यामुळे कोंड्याची समस्याही वाढते. केसांची निगा राखण्याची नियमितता न बाळगल्याने टाळूला खाज सुटते आणि कोरडेपणा येतो. ज्यामुळे टाळूची त्वचा कोरडी  होते आणि कोंडा वाढतो. केसांची स्वच्छता न ठेवल्याने कोंडा होण्याचे प्रमाण वाढते. या परिस्थितीला तोंड देण्यासाठी, बहुतेक लोक वेगवेगळ्या प्रकारचे शॅम्पू आणि कंडिशनर वापरतात. पण जर तुम्हाला कोंड्याची समस्या नैसर्गिक पद्धतीने दूर करायची असेल तर या सोप्या घरगुती उपायांचा अवलंब करा.

अमेरिकन अ‍ॅकॅडमी ऑफ डर्मेटोलॉजीच्या मते, झिंक पायरिथिओन, सल्फर, सॅलिसिलिक अ‍ॅसिड आणि सेलेनियम सल्फाइड सारखे घटक टाळूवर वाढणारा कोंडा कमी करण्यास मदत करतात . यामुळे केसांचा कोरडेपणा कमी होण्यास मदत होते. याशिवाय केसांची वाढ देखील होते. हार्मोनल बदलांमुळे आणि उन्हामुळे होणारे केस गळणे देखील टाळता येते.

 

मेथी आणि जास्वंदाची फुले-

केसांचा कोरडेपणा कमी करण्यासाठी प्रथिने आवश्यक असतात. मेथीच्या बियांमध्ये असलेले प्रथिने आणि निकोटिनिक अ‍ॅसिड केसांमधील कोंडा कमी करण्यास मदत करते. ज्यामुळे केसांचा कोरडेपणा कमी होतो. यासाठी मेथीचे दाणे रात्रभर भिजत ठेवा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ते बारीक करून पेस्ट बनवा. जास्वंदीच्या पानांची पेस्ट बनवा आणि ती मिसळा आणि टाळूवर लावा. ३० मिनिटांनी केस धुवा.

कांद्याचा रस-

केसांमधील कोंडा टाळण्यासाठी सल्फरयुक्त कांद्याचा रस फायदेशीर ठरतो. कांद्याच्या रसात खोबरेल तेल मिसळून टाळूची मालिश केल्याने कोंडा निर्माण करणाऱ्या बुरशीपासून आराम मिळतो. केस धुण्यापूर्वी, हे मिश्रण तुमच्या टाळूवर ३० ते ४० मिनिटे लावा आणि नंतर केस धुवा.

टी ट्री ऑइल आणि अ‍ॅलोवेरा जेल-

अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल एजंट, टी ट्री ऑइल कोंडा कमी करण्यास मदत करते. अ‍ॅलोवेरा जेलमध्ये टी ट्री ऑइलचे काही थेंब मिसळा आणि टाळूवर मसाज करा. ५ ते १० मिनिटे स्क्रब केल्यानंतर केस धुवा.  टी ट्री ऑइल  डोक्यातील कोंडा दूर करण्यासाठी प्रभावी आहे. खोबरेल तेल आणि ऑलिव्ह ऑइल सारख्या कॅरियर ऑइलमध्ये मिसळून ते वापरणे देखील फायदेशीर आहे. ते शॅम्पूमध्येही मिसळता येते.

कडुलिंबाची पाने आणि लिंबाचा रस-

लिंबूमध्ये सायट्रिक अ‍ॅसिड आढळते. तर कडुलिंबाच्या पानांमध्ये असलेले अँटीफंगल गुणधर्म केसांना निरोगी आणि मऊ बनवतात. यासाठी काही कडुलिंबाची पाने घ्या आणि ती पाण्यात उकळा. पाणी काही मिनिटे उकळल्यानंतर ते गाळून घ्या आणि त्यात लिंबाचा रस घाला. आता ते केसांना लावा.

दही आणि मध-

मध त्वचेसाठी तसेच केसांसाठी हायड्रेटिंग एजंट म्हणून काम करते. याशिवाय, दह्यामध्ये प्रोबायोटिक्स भरपूर प्रमाणात असतात. अशा परिस्थितीत दोन चमचे दह्यात एक चमचा मध मिसळा आणि नंतर ते डोक्याला लावा. बोटांनी मालिश करा आणि केस धुवा.
(टीप : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)

About Author

Aiman Jahangir Desai

Other Latest News