पायात सतत गोळे येतात ? ‘हे’ उपाय करा त्वरित मिळेल आराम

रात्री झोपेत पायात क्रॅम्प्स येतात-झोप मोड होते , 'या' घरगुती उपायांनी मिळेल आराम

पायात गोळे येणं ही खरंतर खूपच कॉमन तक्रार असते. विशेषत: 30 ते 55 या वयोगटातील महिलांमधे ही तक्रार प्रामुख्याने आढळते. पोटरीच्या स्नायुंमधे अशा हालचालीे निर्माण होतात ज्यावर आपलं नियंत्रण नसतं.अशा पध्दतींच्या हालचालींमुळे स्नायू एकदम कडक होतात. स्नायू अचानक आखडल्यानं आणि कडक झाल्यानं वेदना होतात. बहुतांश केसेसमधे पायात गोळे येण्याची तक्रार रात्री झोपेतच येते. प्रचंड वेदनांनी जाग येते, बराच वेळ पाय हलवता येत नाही. कधी कधी जास्त तीव्रतेचा गोळा आला असेल तर दुसर्‍या दिवशी पोटरीत वेदना होत राहातात. पुरुषांच्या तुलनेत बायकांमधे पायात गोळे येण्याचं प्रमाण जास्त आहे. पायात गोळे येण्याची कारणं अनेक आहेत.

पायात गोळे का येतात?

  • सध्या तर ज्या महिला वर्क फ्रॉम होम करत आहे त्यांच्यात पायात गोळे येण्याची तक्रार मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे. याचं कारण खूप वेळ बसून काम केलं जातंय. मांडी घालून किंवा खुर्चीत पाय जमिनीला न टेकवता खूप वेळ बसणे.
  • शरीराचे विशिष्ट अवयवांचे स्नायू जसे हात पाय यांच्या स्नायुंचं स्ट्रेचिंग होणं गरजेचं असतं. त्याच्यामधे पायाचे स्नायू त्यातही मांडी आणि पोटर्‍यांचे स्नायू यांना स्ट्रेचिंग खूप आवश्यक आहे.पण ते जर स्ट्रेचिंग मिळालं नाही तर तिथले स्नायू शिथील होतात. त्यामुळे पायात गोळे येतात.
  • बरेचदा तासनतास खुर्चीत बसून जेव्हा काम केलं जातं तेव्हा पायावर पाय टाकून बसलं जातं. तर तसं केल्यानंही पायात गोळे येण्याचा त्रास होतो.

‘या’ घरगुती उपायांनी मिळेल आराम

  • जर तुमच्या पायांमध्ये क्रॅम्पस येत असतील तर अंगठे पकडून स्ट्रेच करा. मांड्यांमध्ये क्रॅम्प असल्यास उभं राहून पोश्चर स्ट्रेच करा. मसल्समध्ये क्रॅम्प आल्यास लगेच हात किंवा मसाजरच्या मदतीनं ती जागा दाबा आणि स्नायूंची मसाज करा.
  • उभं राहून तळवे जमिनीवर जोरात दाबा, गरम पाण्यानं शेका किंवा गरम पाण्यात पाय बुडवून ठेवा. तुम्ही गरम पाण्यानं अंघोळही करू शकता.
  • एका टॉवेलमध्ये आईस पॅक ठेवा आणि मसल्सभोवती रॅप करून काही मिनिटं शेक घ्या. या उपायानं तुम्हाला लवकरात लवकर आराम मिळेल.
  • एका वाटीत तिळाचे तेल घेऊन त्यात भिमसेन कापूर पावडर टाका आणि मिक्सिंग करून हे तेल पायांना लावून चोळावे. पंधरा मिनिटे करा हळूहळू गोळा निघून जाईल..
  • एका वाटीत लिंबू रस काढून घ्यावा. हा रस पायाला चोळा. ,मग त्यांवर साधे मीठ चोळावे. आणि एका रुमालात खडे मीठ घालून तव्यावर गरम करून , याचि पुरचूंडी बांधून हळूहळू पाय शेका. या तिन गोष्टी एकत्र केल्यास पायात आलेले गोळे जातात. व आराम मिळतो.

(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News