मुंबई – सध्या सूर्य आग ओकतोय… उन्हाच्या कडाक्यामुळे सगळेच हैराण झाले आहेत. तापमानातील पारा वाढल्यामुळं सर्वत्र गर्मी आणि अंगाची लाही-लाही होत आहे. पावसाला अजून दोन महिने अवधी असताना पाण्याचाही तुटवडाही जाणत असताना आता राज्यातील अनेक भागात ४२ अंश सेल्सिअसच्यावर तापमानाची नोंद झाली आहे. त्यामुळे दुपारी घराबाहेर पडणे अवघड होत असून आगामी काळात उष्णतेचा लाटेचा इशाराही देण्यात आला आहे.
उष्णतेच्या लाटेचा इशारा कुठे?
दरम्यान, मागील तीन दिवसापासून राज्यातील अनेक जिल्ह्यात 42°c पेक्षा अधिक तापमान आहे. मराठवाडा, विदर्भसह अनेक भागात मोठ्या प्रमाणात तापमानाचा पारा वाढला आहे. 42°c पेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या विभागीतील काही जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर लातूर, धाराशिव, बीड इथे उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट हवामान खात्याने जारी केला आहे. तसेच सकाळी बारा ते दुपारी एकपर्यंत या दरम्यान जर गरजेचे काम असेल तरच घराबाहेर पडा, अन्यथा घराबाहेर पडू नका असेही प्रशासनाने म्हटले आहे.

राज्यातील मुख्य जिल्ह्याचे तापमान किती?
मुंबई – 36 अंश सेल्सिअस
नागपूर – 44 अंश सेल्सिअस
परभणी – 42 अंश सेल्सिअस
अकोला – 44.3 अंश सेल्सिअस
अमरावती – 44.4 अंश सेल्सिअस
चंद्रपूर – 44.6 अंश सेल्सिअस
वर्धा – 44. अंश सेल्सिअस