मुंबई – मुंबईची रेल्वे लोकल ही मुंबईकरांची जीवनवाहिनी मानली जाते. तसेच मुंबईकरांची बेस्ट बसेस ही दळणवळणासाठी आणि वाहतुकीसाठी जीवनवाहिनी समजली जाते. कारण मुंबईतील अनेक जवळच्या भागात जाण्यासाठी मुंबईकर बेस्ट बसेसला प्राधान्य देतात. मुंबईची ही बेस्ट बसेस मागील कित्येक वर्षापासून तोट्यात आहे… डबघाईला आहे अशी ओरड नेहमी ऐकायला मिळते. तसेच कित्येक वर्षापासून बेस्ट तिकिटाची भाडेवाढ झाली नाही. त्यामुळं आता मुंबईकरांचा बेस्ट प्रवास महाग होणार असल्याची माहिती समोर येत आहे. बेस्ट बसेसच्या तिकिटामध्ये भाडेवाढ होणार असल्याचे बोलले जात आहे.
प्रस्तावाला पालिकेकडून मंजुरी…
दरम्यान, मुंबईची बेस्ट बसेस ही मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीत येते. बेस्ट बसेस ही आर्थिक तोट्यात आहे. बेस्ट बसेसमधील कर्मचारी, चालक-वाहक यांचा पगार तसेच बेस्ट बसेसचे मेंटेनन्स याचा खर्च अधिक होत आहे. आणि बेस्ट बसेसचे उत्पन्न कमी अशी वस्तुस्थिती आहे. त्यामुळे तसेच कित्येक वर्षापासून बेस्टच्या भाडेवाढ केले नाही. त्यामुळे आता बेस्ट बसेसचे भाडेवाढ होणार आहे. या भाडेवाढीबाबतचा प्रस्ताव मुंबई महानगरपालिका प्रशासनाने मंजूर केला असून, हा प्रस्ताव राज्य परिवहन महामंडळाकडे पाठवला आहे. त्यामुळे राज्य परिवहन मंडळ या प्रस्तावावर कोणता निर्णय घेते. हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

दुप्पटीने भाडेवाढ होणार?
दुसरीकडे गेल्या आठवड्यात मुंबईतील बेस्ट बसेस अधिकारी, पदाधिकारी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात एक बैठक पार पडली होती. या बैठकीत बेस्ट बसेस मधील अडचणी, समस्या, प्रश्न आणि उत्पन्न कसे कमी आहे. खर्च कसा जास्त आहे याची व्यथा अधिकारी, पदाधिकाऱ्यांनी मांडल्या होत्या. त्यावेळी तुम्ही बेस्ट बसेस मधील उत्पन्नाचे स्त्रोत वाढवण्याचा प्रयत्न करा…, अधिक उत्पन्न कसे मिळेल याचा विचार करा, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याने बेस्ट प्रशासनाला दिल्या होत्या. यानंतर आता या आठवड्यात बेस्ट प्रशासनाने भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतलाय. हा प्रस्ताव महापालिकेने मंजूर करून तो राज्य परिवहन मंडळाकडे पाठवला आहे. त्यामुळे आता परिवहन महामंडळ प्रस्तावावर कोणता निर्णय घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. ही भाडेवाढ दुप्पटीने होणार असल्याचे बोलले जात आहे. जिथे ५ रुपये तिकिट आहे तिथे १० रुपये होणार आहे. परंतु एकीकडे वाढती महागाई, बेरोजगारी यामुळे अधिक मुंबईकर पिचला आहे. त्यातच आता ही भाडेवाढ झालीतर मुंबईकरांच्या खिशाला कात्री बसणार असून, त्यांचे महिन्याचं आर्थिक बजेट सुद्धा कोलमडणार आहे.