मुंबई – मुंबईकरांनो, शुक्रवारी आणि शनिवारी रेल्वेने लोकलने प्रवास करणार असाल तर ही बातमी नक्की वाचा, अन्यथा तुम्ही रेल्वे प्रवासात अडकू शकता. पश्चिम रेल्वेवर माहिम ते बांद्रा स्थानकांदरम्यान पुलाचा गर्डर टाकण्यासाठी शुक्रवार आणि शनिवारी रात्री मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक दरम्यान लोकलसह मेल-एक्सप्रेसच्या वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. दोन दिवसांमध्ये सुमारे ३३४ लोकल सेवा रद्द करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वेने दिली आहे.
कुठे असणार ब्लॉक?
दरम्यान, शुक्रवारी रात्री १०:२३ नंतर चर्चगेट स्थानकातून सुटणाऱ्या सर्व डाऊन धिम्या आणि चर्चगेटच्या दिशेला येणाऱ्या अप धिम्या लोकल मुंबई सेंट्रल-सांताक्रुझ दरम्यान जलद मार्गावरून धावणार आहेत. त्यामुळं महालक्ष्मी, लोअर परेल, प्रभादेवी, माटुंगा रोड, माहिम आणि खार रोड स्थानकात लोकल उपलब्ध नसणार आहेत. शनिवारी ब्लॉक दरम्यान चर्चगेट दादर दरम्यान जलद लोकल धावणार त्यामुळे शनिवार रात्री/रविवार सकाळी डहाणू रोड, विरार, नालासोपारा, वसई रोड, भाइंदर बोरीवली करून सुटणाऱ्या लोकल अंधेरीपर्यंत धावणार. तर चर्चगेट – विरार शेवटची लोकल शनिवारी रात्री १०:५३ वाजता सुटणार आहे. शुक्रवारी रात्री १०:२३ नंतर चर्चगेट स्थानकातून सुटणाऱ्या सर्व धिम्या आणि चर्चगेटच्या दिशेला येणाऱ्या अप धिम्या लोकल मुंबई सेंट्रल-सांताक्रुझ दरम्यान जलद मार्गावरून धावणार आहेत. परिणामी महालक्ष्मी, लोअर परेल, प्रभादेवी, माटुंगा रोड, माहिम आणि खार रोड स्थानकात थांबणार नाहीत. अशी माहिती पश्चिम रेल्वेने दिली आहे.

कुठे धावणार लोकल…
विरार स्थानकातून शेवटची चर्चगेट लोकल रात्री १२:०५ वाजता सुटणार. ब्लॉक दरम्यान चर्चगेट-दादर दरम्यान लोकल जलद मार्गावरून धावणार आहेत. ब्लॉक कालावधीत गोरेगांव-बांद्रा दरम्यान लोकल हार्बर मार्गावरून चालविण्यात येणार. तसेच विरार-अंधेरी दरम्यान लोकल धिम्या-जलद मार्गावरून धावणार आहेत. शनिवारी सकाळी ६:१० वाजता भाईंदर स्थानकातून पहिली चर्चगेट लोकल रवाना होणार आहे. ही लोकल सांताक्रुझ ते मुंबई सेंट्रल दरम्यान जलद मार्गावरून धावणार.
- शनिवार बोरीवली-चर्चगेट दरम्यान पहिली धीमी लोकल सकाळी ८:०३ वाजता सुटणार
- चर्चगेट स्थानकातून पहिली जलद लोकल सकाळी ६:१४ वाजता बोरीवलीकरिता सुटणार
- चर्चगेट – विरार पहिली जलद लोकल सकाळी सव्वा सहा वाजता धावणार
- चर्चगेट-बोरीवली दरम्यान पहिली धीमी लोकल सकाळी ८:०३ वाजता सुटणार
ब्लॉक -२ (शनिवार रात्री)
मार्ग – अप-डाउन धिम्या, डाउन धिम्या मार्गावर रात्री ११:३० ते सकाळी ९, अप जलद मार्गावर रात्री ११:३० ते सकाळी ८ वाजेपर्यत
परिणाम – ब्लॉक दरम्यान चर्चगेट – दादर दरम्यान जलद लोकल धावणार
शनिवार रात्री/रविवार सकाळी डहाणू रोड, विरार, नालासोपारा, वसई रोड, भाईदर बोरीवलीहून सुटणाऱ्या लोकल अंधेरीपर्यंत धावणार
चर्चगेट – विरार शेवटची लोकल रात्री १०:५३ वाजता
रविवारी विरार – चर्चगेट पहिली धीमी लोकल सकाळी ८:०८ वाजता
रविवारी भाईंदर – चर्चगेट पहिली लोकल सकाळी ८:२४ वाजता
विरार – चर्चगेट पहिली जलद लोकल सकाळी ८:१८ वाजता
चर्चगेट- विरार पहिली जलद लोकल सकाळी ९:०३ वाजता